Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्धादरम्यान PM मोदींचा मोठा पुढाकार, इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरुन केली चर्चा

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत नवे संकट निर्माण झाले.
Prime Minister Narendra Modi & Iran President SyedIbrahim Raisi
Prime Minister Narendra Modi & Iran President SyedIbrahim RaisiDainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत नवे संकट निर्माण झाले आहे. युद्ध दिवसेंदिवस प्राणघातक होत आहे. आतापर्यंत हजारो निरपराधांना जीव गमवावा लागला आहे.

जगभरातील अनेक नेत्यांनी हे युद्ध थांबवण्याचे आवाहन केले, पण कोणाचेही आवाहन कामी येत नाहीये. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन सोमवारी संध्याकाळी इराणचे राष्ट्राध्यक्ष सय्यद इब्राहिम रायसी यांच्याशी चर्चा केली.

इस्रायल-हमास संघर्षावर सविस्तर चर्चा झाली

इराणचे राष्ट्राध्यक्ष सय्यद इब्राहिम रायसी यांच्याशी बोलल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यावेळी पश्चिम आशियातील कठीण परिस्थिती आणि इस्रायल-हमास संघर्ष यावर सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दहशतवादी (Terrorist) घटना, हिंसाचार आणि नागरिकांचे होणारे नुकसान हा गंभीर चिंतेचा विषय आहे. युद्धादरम्यान मानवतावादी सहाय्य सुनिश्चित करणे, शांतता आणि स्थिरता लवकर पुनर्संचयित करणे हे या टप्प्यावर अत्यंत महत्त्वाचे आहे. चाबहार बंदरासह आमच्या द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचे आम्ही स्वागत केले, असेही त्यांनी म्हटले आहे.

Prime Minister Narendra Modi & Iran President SyedIbrahim Raisi
Israel - Hamas War 2023: 48 तासांत इस्रायली सैन्य पोहचणार गाझा सिटीत, धोकादायक ग्राउंड ऑपरेशनच्या भीतीने हमास सैरभैर

दुसरीकडे, इस्त्रायल-हमास युद्ध सुरु झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि पॅलेस्टाईन प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशीही चर्चा केली होती.

एक दिवस आधी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी 5 नोव्हेंबर रोजी (रविवारी) इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर-अब्दुल्लाहियान यांच्याशी इस्रायल-हमास संघर्षाबाबत फोनवरुन चर्चा केली होती. जयशंकर म्हणाले होते की, त्यांनी इराणचे (Iran) परराष्ट्र मंत्री आमिर-अब्दुल्लाहियान यांना संघर्ष थांबवणे आणि मानवतावादी मदत पुरवण्याचे महत्त्व सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com