Israel-Hamas War: हमास प्रमुख आणि पाकिस्तानी नेत्याची खलबतं; पॅलेस्टाईनची काश्मीरशी तुलना करत...

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील महिन्याभरापासून घनघोर युद्ध सुरु आहे.
Hamas Leader Ismail Haniyeh & Pakistan Leader Fazl UR Rehman
Hamas Leader Ismail Haniyeh & Pakistan Leader Fazl UR RehmanTwitter /@thakurbjpdelhi
Published on
Updated on

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील महिन्याभरापासून घनघोर युद्ध सुरु आहे. यातच आता, इस्रायलच्या विरोधात हमास या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ पाकिस्तान उघडपणे समोर आला आहे.

डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या जमात-ए-उलामा-ए-इस्लामीचे प्रमुख फजलुर रहमान यांनी कतारमध्ये हमास प्रमुख इस्माइल हनीये यांची भेट घेतली. रहमान यांनी हमासचे माजी प्रमुख खालिद मशाल यांचीही भेट घेतली.

यावेळी फजलुर रहमान यांनी काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी केली. इस्रायलविरुद्ध सुरु असलेल्या युद्धाला पाश्चिमात्य देश जबाबदार असल्याचे ते म्हणाले. मानवाधिकाराच्या गप्पा मारणारे देश इस्रायलला शस्त्रे पुरवत आहेत.

मुस्लिम देशांना आवाहन

रहमान म्हणाले की, 'विकसित देशांचे हात गाझातील निष्पाप महिला आणि मुलांच्या रक्ताने माखले आहेत. पॅलेस्टिनी केवळ जमिनीसाठीच लढत नाहीत तर ते धर्मयुद्धही चालवत आहेत.' रहमान यांनी मुस्लिम देशांना पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ उभे राहण्याचे आवाहन केले.

Hamas Leader Ismail Haniyeh & Pakistan Leader Fazl UR Rehman
Israel-Hamas War: हमास, हिजबुल्लाह आणि हौथीच्या हल्ल्याने इस्रायलच्या वाढल्या अडचणी, गाझामध्ये ग्राउंड ऑपरेशन तीव्र

अणुबॉम्ब टाकण्याची शक्यता व्यक्त करणाऱ्या मंत्र्याचे निलंबन

इस्रायलचे (Israel) हेरिटेज मंत्री अमिचाई एलियाहू यांनी एक दिवसापूर्वी गाझा पट्टीवर अणुबॉम्ब टाकला जाऊ शकतो असा दावा केला होता. मंत्री अमिचाई यांनी रेडिओ कोल बेरामाला दिलेल्या मुलाखतीत ही भीती व्यक्त केली होती. मात्र, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमिचाई एलियाहू यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच, अमिचाई यांना निलंबित करण्यात आले आहे.

इस्रायलने गाझाचे दोन तुकडे केले

इस्रायलने गाझाचे दोन भाग केले आहेत. एक उत्तर गाझा आणि दुसरा दक्षिण गाझा. रविवारी रात्रभर गाझा पट्टीतील रुग्णालयांवर इस्रायली लष्कराने जोरदार बॉम्बहल्ला केला. या काळात इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. दुसरीकडे, अमेरिकेने आपली कमांड न्यूक्लियर पाणबुडी मध्यपूर्वेत पाठवली आहे. ही ओहायो श्रेणीची पाणबुडी अण्वस्त्रांनी सुसज्ज आहे.

Hamas Leader Ismail Haniyeh & Pakistan Leader Fazl UR Rehman
Israel-Hamas War: इस्रायलला आणखी एका मुस्लिम देशाचा धक्का, तुर्कीने राजदूताला बोलावले परत!

एका महिन्यात 10 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला

दुसरीकडे, 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या (Hamas) दहशतवाद्यांनी इस्रायलवर 5 हजार बॉम्ब फेकले. घुसखोरी करताना सैनिकांनी 240 लोकांना ओलीस ठेवले होते. बॉम्बहल्ल्यात 1400 इस्रायली मारले गेले. इस्रायलला या हल्ल्याची कल्पना नव्हती.

अचानक झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर देत पहिला हवाई हल्ला केला. मग ते जमिनीवर उतरले आणि गाझाला वेढा घातला. महिनाभरापासून सुरु असलेल्या या युद्धात 9 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com