Goa Economic Survey 2023 : विकासदरात 10.33 टक्के वाढ अपेक्षित : आर्थिक पाहणी अहवाल

राज्य सकल उत्पन्‍नात 9.11 टक्‍के वाढ; कर्ज 1100 कोटी रुपयांनी वाढले
Goa Economic Survey 2023
Goa Economic Survey 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. बुधवारी मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे बजेट सादर करतील. तत्पूर्वी मंगळवारी आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर करण्‍यात आला.

पुढील वर्षात राज्याच्या विकासदरात 10.33 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे त्‍यात म्हटले आहे. दरम्यान, राज्यावरील कर्ज 1100 कोटी रुपयांनी वाढले आहे. 2022 मध्ये 20,824 कोटींचे कर्ज आता 21,940 झाले आहे.

मुख्‍यत: मोपा येथे साकारलेला मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळ, उच्‍च शिक्षण देणाऱ्या संस्‍थांची स्‍थापना, पर्यटन क्षेत्रासाठी आखण्‍यात येणारे धोरण, खाणकाम सुरू करण्‍यासाठी उचलण्‍यात आलेली पावले या जोरावर अर्थव्‍यवस्‍था झेपावेल, असा विश्‍‍वास आहे.

राज्‍य सकल उत्‍पन्‍न 90641.86 कोटींवर पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. गोव्‍यातील बँकांमध्‍ये 1 लाख 1 हजार 780 कोटी रुपयांच्‍या ठेवी आहेत; तर 30 हजार 769 कोटींचे कर्ज आहे, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे.

Goa Economic Survey 2023
Goa Budget 2023: पेटाऱ्यात उद्योगांसाठी दडलंय काय ? ‘जीआयडीसी’त किमान 25 कोटींची तरतूद अपेक्षित

दरडोई उत्‍पन्‍न वाढले

  • आर्थिक पाहणी अहवालात म्‍हटले आहे,

  • 2021-22 मध्‍ये दरडोई उत्पन्न 5,27,146 रुपयांपर्यंत वाढले आहे.

  • जे 2017-18 मध्‍ये 4,54,172 रुपयांवरून 2020-21मध्ये 4,86,851 पर्यंत वाढले होते.

  • पुढील कालावधीत 40, 195 रुपयांची त्‍यात वाढ झाली आहे.

सकल उत्‍पन्‍न वाढ ९.११ टक्‍के

  • 75705.40 कोटी रुपये 2020-21

  • 82603.70 कोटी रुपये 2021-22

  • 9.11 % वाढ 21-22 मध्ये नोंदवली गेली आहे.

1187.95 कोटींची गुंतवणूक

गोवा गुंतवणूक प्रोत्‍साहन मंडळाने रोजगार निर्मितीसाठी एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत 11 नवीन औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्‍यातून 1187.95 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे आणि 4,697 लोकांना रोजगार मिळू शकेल.

लोकसंख्या सुमारे 15.75 लाख

गोव्‍यात लोकसंख्‍या सुमारे 15,75,000 असून, त्यापैकी महिला 7.81 लाख आहेत. तर 7.93 लाख पुरुष आहेत. 2011-2036 साठी भारत आणि राज्यांसाठी लोकसंख्या अंदाज अहवाल आयोगाने प्रकाशित केला आहे.

जन्मदर घटला

2020 साली राज्यातील जन्मदर प्रति हजार लोकसंख्येमागे 11.66 होता; परंतु 2021 मध्ये तो कमी झाला आणि दर हजार लोकसंख्येमागे 9.72 इतका झाला. त्‍याचप्रमाणे 2011 ते 2023 या कालावधीत ग्रामीण लोकसंख्येत सरासरी घट 1.15 टक्के आहे.

Goa Economic Survey 2023
Goa Assembly Session 2023: म्हादईवरून विरोधक आक्रमक; सरकारला घेरले

वार्षिक दूध उत्पादन

एकात्मिक नमुना सर्वेक्षणानुसार,

  • राज्‍यात वार्षिक दूध उत्पादन 63205.540 टन,

  • 438.32 लाख टन अंडी उत्पादन

  • 5927.863 टन मांस उत्पादन असा अंदाज आहे.

मोटार वाहने 11.72 लाख

राज्‍यात खासगी वाहनांची खरेदी वाढत आहे. 31 डिसेंबर 2022 पर्यंत राज्यात थेट नोंदणी झालेल्‍या एकूण मोटार वाहनांची संख्या 11.72 लाख आहे. हा आकडा पुढील काळात वाढेल.

खाण उद्योगाकडून आशा

राज्‍यात खाण उद्योग पुन्‍हा सुरू होत आहे. अहवालात म्‍हटले आहे की, पहिल्‍या टप्‍प्‍यात चार खनिज ब्‍लॉक्‍सचा लिलाव करण्‍यात आला आहे. त्‍यात संबंधित कंपन्‍यांसोबत कागदोपत्री पूर्तता झाली असून, कंपन्‍यांनी ४३१८.८१ लाख रुपये आगाऊ रक्‍कम जमा केली आहे.

१.२६ लाख गृह आधार

२०२२-२३ या वर्षात १,२६,६७४ महिलांना गृह आधार योजनेंतर्गत २०,३८८.८६ लाख रुपये खर्च करण्‍यात आले, तर लाडली लक्ष्मी योजनेंतर्गत ५९७८ युवतींना लाभ झाला आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत ३५५२ मातांना मदत करण्यात आली.

डिजिटल व्‍यवहारांत आघाडी

राज्‍य डिजिटल आर्थिक व्‍यवहारात आघाडीवर आहे. देशपातळीवर गोव्‍यात ९३ टक्के डिजिटल पद्धतीने व्‍यवहार झाले. त्‍यात गोवा देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटी डिजिटल देवाण-घेवाण पद्धतीत पणजी शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com