Pakistan Citizen Murdered Near Iran Border: इराण आणि पाकिस्तानमधील वाद अधिकच गडद होत चालला आहे. इराण-पाकिस्तान सीमेजवळ 9 पाकिस्तानींची हत्या करण्यात आली आहे. इराणमधील पाकिस्तानचे राजदूत मुदस्सीर टिपू यांनी या हत्येला दुजोरा दिला आणि सर्व नऊ पाकिस्तानींना गोळ्या घालण्यात आल्याचे सांगितले. हल्लेखोर इराणचे होते. सरवण शहरातील सिरकन भागात घरात घुसून ही हत्या करण्यात आली. इराण पोलीस कारवाई करण्यात व्यस्त आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे पाकिस्तान इतका अस्वस्थ झाला आहे की, त्याने तेहरानला आरोपींवर कारवाई करण्याचा अल्टिमेटम दिला, अन्यथा त्याचे परिणाम संपूर्ण इराणला भोगावे लागतील. पाकिस्तानी दूतावास पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहे. तेहरानने या कारवाईमध्ये सहकार्य करावे. इराणच्या सरवण प्रांताचे डेप्युटी गव्हर्नर अलिरेझा मरहमती यांनी इराणची अधिकृत वृत्तसंस्था IRNA ला सांगितले की, या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर 12 दिवसांनी ही घटना घडली आहे. 16 जानेवारीला इराणने पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने इराणच्या 48 किलोमीटर आत घुसून सरवण शहरात हवाई हल्ला केला. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आता सरवण शहरातच तीन बंदूकधाऱ्यांनी पाकिस्तानी नागरिकांवर गोळ्या झाडल्या.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणच्या सरवण शहरात ठार झालेले सर्वजण पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतातील रहिवासी होते आणि ते ऑटो रिपेअरिंगचे काम करत होते. इराण आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना पाकिस्तानने इराणमधील आपले राजदूत मुदस्सीर टिपू यांना परत बोलावले. शनिवारी रात्री 9 पाकिस्तानींची हत्या झाली तेव्हाच ते तेहरानहून परतले होते. पाकिस्तानने इराण सीमेजवळील बलुचिस्तानमध्ये कलम 144 लागू केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.