VIDEO: इराणवर काडीचाही भरवसा नाही...! मध्यपूर्वेतील युद्धावरुन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा थेट हल्लाबोल; अण्वस्त्रांवरुनही ठणकावलं

Donald Trump Iran Policy 2026: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत अत्यंत आक्रमक भूमिका मांडली.
Donald Trump Iran Policy 2026
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

Trump Distrust in Iranian Leadership: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. इराणवर आपला काडीचाही विश्वास नसल्याचे स्पष्ट करत ट्रम्प यांनी त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत मोठे विधान केले. एका मुलाखतीदरम्यान "तुम्ही इराणच्या कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवता?" असा प्रश्न विचारला असता ट्रम्प यांनी सडेतोड उत्तर दिले. "माझा कोणावरही विश्वास नाही. तुम्ही विश्वासाची गोष्टच का करता? मला त्यांच्यावर विश्वास आहे असे तुम्हाला वाटते का? मुळीच नाही," अशा शब्दांत त्यांनी आपला अविश्वास व्यक्त केला.

इराणच्या (Iran) अण्वस्त्र क्षमतेवर भाष्य करताना ट्रम्प म्हणाले की, जर इराणकडे आज अण्वस्त्रे असती, तर त्यांनी आतापर्यंत त्याचा वापरही केला असता. "माझ्या पहिल्या कार्यकाळात जर मी बराक ओबामा यांनी केलेला इराण अणुकरार रद्द केला नसता, तर त्यांच्याकडे तीन-चार वर्षांपूर्वीच अण्वस्त्रे आली असती आणि त्यांनी ती वापरलीही असती. मात्र, आम्ही त्यांची अण्वस्त्र क्षमता पूर्णपणे मोडीत काढली आहे," असा दावा ट्रम्प यांनी केला. सध्या इराणसोबत सुरु असलेल्या चर्चेत जेडी व्हॅन्स, मार्को रुबिओ, जेरेड कुशनर आणि स्टीव विटकॉफ यांसारखे महत्त्वाचे नेते आणि स्वतः ट्रम्प यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

Donald Trump Iran Policy 2026
Iran US Israel War: इराणवर आतापर्यंतचा सर्वात भीषण प्रहार! 'युद्ध आमच्याच अटींवर संपणार', अमेरिकन संरक्षण सचिवांची गर्जना

इराणमधील नेतृत्वाबाबत विचारले असता ट्रम्प यांनी अत्यंत धक्कादायक विधान केले. ते म्हणाले, "आम्ही त्यांच्या सर्व जुन्या नेत्यांना संपवले. त्यानंतर त्यांनी नवीन नेते निवडण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यांनाही संपवले. आता तिथे नेत्यांचा एक नवीन गट आहे, आम्ही त्यांनाही सहज हाताळू शकतो, पण ते स्वतःला कसे सिद्ध करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. हे एक प्रकारचे सत्तांतरच आहे, कारण सध्याचे नेते हे समस्या निर्माण करणाऱ्या जुन्या नेत्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत."

Donald Trump Iran Policy 2026
Iran US War: ''सार्वभौमत्वावर घाला घालाल तर...'' इराणी राष्ट्राध्यक्षानं ट्रम्पला दिला सज्जड दम; 'आर-पार'च्या लढाईचा व्यक्त केला निर्धार!

होर्मुजच्या सामुद्रधुनीवर आता कोणाचे नियंत्रण असेल, या प्रश्नावर ट्रम्प यांनी अमेरिकेचे (America) वर्चस्व अधोरेखित केले. "आम्हाला ज्या गोष्टीवर नियंत्रण हवे आहे, त्यावर आमचेच नियंत्रण असेल. कोणत्याही जीवितहानीशिवाय किंवा इराणचे अब्जावधी डॉलर्सचे वीज प्रकल्प नष्ट न करता जर ही परिस्थिती शांततेत संपवता आली, तर मला ते नक्कीच आवडेल. मात्र, त्यांना अण्वस्त्रे मिळू शकणार नाहीत आणि यावर ते सहमतही झाले आहेत. इराण सध्या अत्यंत कमकुवत स्थितीत असून त्यांच्याकडे ना नौदल उरले आहे, ना वायूदल आणि ना क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा. आम्ही सध्या सौदेबाजीच्या सर्वात मजबूत स्थितीत आहोत," असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com