'चीन, रशिया आणि इराणला देशातून हाकलून लावा, नाहीतर...,' डोनाल्ड ट्रम्पनं पुन्हा भरला दम; व्हेनेझुएलाच्या तेलासाठी केला मास्टर प्लॅन

Donald Trump Venezuela Oil Policy: दक्षिण अमेरिकेतील खनिज तेलाचा सर्वात मोठा साठा असलेला व्हेनेझुएला सध्या भीषण राजकीय आणि आर्थिक संकटातून जात आहे.
Donald Trump Venezuela Oil Policy
Donald Trump Dainik Gomantak
Published on
Updated on

Donald Trump Venezuela Oil Policy: दक्षिण अमेरिकेतील खनिज तेलाचा सर्वात मोठा साठा असलेला व्हेनेझुएला सध्या भीषण राजकीय आणि आर्थिक संकटातून जात आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरुन हटवून अमेरिकेत नेल्यानंतर आता तिथे डेल्सी रॉड्रिग्ज यांनी अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या नव्या सरकारसमोर अत्यंत कडक अटी ठेवल्या आहेत. ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले की, जर व्हेनेझुएलाला त्यांच्या साठ्यातून अधिक तेल काढायचे असेल, तर त्यांना चीन, रशिया, इराण आणि क्युबा या देशांशी असलेले सर्व आर्थिक संबंध तोडावे लागतील.

ट्रम्प यांच्या अटी आणि तेलाचे राजकारण

एबीसी न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासनाने व्हेनेझुएलाच्या नव्या नेतृत्वाला दोन प्रमुख अटी मान्य करण्यास सांगितले आहे. पहिली अट म्हणजे, व्हेनेझुएलाने आपल्या देशातून चीन, रशिया, इराण आणि क्युबा या देशांना पूर्णपणे काढून टाकावे आणि त्यांच्याशी असलेले व्यापारी व आर्थिक संबंध संपवावेत. दुसरी महत्त्वाची अट अशी की, व्हेनेझुएलाने तेल उत्पादनासाठी केवळ अमेरिकेसोबत भागीदारी करावी आणि कच्चे तेल विकताना अमेरिकेलाच प्राधान्य द्यावे.

Donald Trump Venezuela Oil Policy
Donald Trump Warship: ट्रम्पचा धमाका! तयार करणार जगातील सर्वात मोठी युद्धनौका; वाचा थरकाप उडवणारी माहिती

चीन हा व्हेनेझुएलाचा आजवरचा सर्वात मोठा तेल खरेदीदार राहिला आहे. मात्र, ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेवर चीनची असलेली पकड ढिली करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. ट्रम्प यांनी तर असाही दावा केला की, या दक्षिण अमेरिकन देशावर सध्या त्यांचेच पूर्ण नियंत्रण आहे.

व्हेनेझुएलाची बिकट अवस्था

व्हेनेझुएलासाठी पुढचा मार्ग अत्यंत खडतर दिसत आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी खासदारांना दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका व्हेनेझुएलाला या अटी मानण्यास भाग पाडू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे व्हेनेझुएलाचे सध्याचे तेल टँकर्स पूर्णपणे भरलेले आहेत. अमेरिकेने लावलेल्या नाकेबंदीमुळे व्हेनेझुएलाला आपले तेल विकता येत नाहीये. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, डिसेंबरच्या अखेरीस व्हेनेझुएलाने आपले तेलाचे विहिरी बंद करण्यास सुरुवात केली होती, कारण उत्पादित तेल ठेवण्यासाठी त्यांच्याकडे आता जागा शिल्लक नाही. जर अधिक विहिरी बंद झाल्या, तर व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडू शकते.

Donald Trump Venezuela Oil Policy
Donald Trump: टॅरिफमुळे अमेरिका बनला जगातील 'सर्वात श्रीमंत देश', डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; म्हणाले, 'प्रत्येक नागरिकाला 2000 डॉलर देणार...'

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर व्हेनेझुएला

सीनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीचे अध्यक्ष रॉजर विकर यांनी देखील पुष्टी केली की, अमेरिकेची संपूर्ण योजना व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यावर नियंत्रण मिळवण्यावर अवलंबून आहे. त्यांच्या मते, यासाठी अमेरिकन सैन्याची तैनात करण्याची गरज भासणार नाही, कारण आर्थिक कोंडीतूनच व्हेनेझुएला शरण येईल. अमेरिकेच्या अंदाजानुसार, जर व्हेनेझुएलाने आपला तेल साठा लवकर विकला नाही, तर आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर होण्यासाठी त्यांच्याकडे आता फक्त काही आठवड्यांचाच वेळ शिल्लक आहे.

Donald Trump Venezuela Oil Policy
Donald Trump: ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का? टॅरिफ रद्द झाल्यास अब्जावधी डॉलर्सचा परतावा देण्यासाठी ट्रेजरी विभाग सज्ज

अंतरिम राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यासाठी ही परिस्थिती मोठी डोकेदुखी ठरत आहे. जर त्या अमेरिकेच्या अटी मान्य करतात, तर त्यांना जुन्या मित्र राष्ट्रांचा (चीन, रशिया) रोष पत्करावा लागेल आणि जर अटी नाकारल्या तर देश पूर्णपणे कंगाल होईल. जागतिक राजकारणात व्हेनेझुएलाच्या या तेलाच्या युद्धाचा परिणाम आगामी काळात इंधनाचे दर आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर नक्कीच पाहायला मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com