US Iran War: इराणला उद्ध्वस्त करण्याची ट्रम्प यांची 'ब्लूप्रिंट' तयार! तेहरानसमोर ठेवल्या 10 जाचक अटी; म्हणाले, 'ही फायनल ऑफर'

Donald Trump 10 Conditions For Iran: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी पुन्हा एकदा कूटनीतिक प्रयत्नांना सुरुवात झाली.
Donald Trump 10 Conditions For Iran
Donald Trump Dainik Gomantak
Published on
Updated on

Donald Trump 10 Conditions For Iran: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी पुन्हा एकदा कूटनीतिक प्रयत्नांना सुरुवात झाली. दोन्ही देश शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी तयार झाले असून ही चर्चा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, या चर्चेपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसमोर 10 अटी ठेवल्या असून हा 'शेवटचा पर्याय' असल्याचे बजावले.

जर इराणने या अटी मान्य केल्या नाहीत, तर देशाला उद्ध्वस्त करण्याची थेट चेतावणी ट्रम्प यांनी दिली. या अटींमध्ये इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे बंद करणे आणि होर्मुजच्या सामुद्रधुनीवरील ताबा सोडणे यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे, जे इराणच्या सार्वभौमत्वासाठी अत्यंत संवेदनशील मानले जातात.

Donald Trump 10 Conditions For Iran
US Iran War: ट्रम्प यांचा इराणला थेट 'चेकमेट'! अमेरिकन नौदलाकडून बंदरांची नाकेबंदी; होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचे ढग दाटले

अमेरिकेने इराणसमोर ठेवलेल्या 10 मुख्य अटींमध्ये आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना अणू केंद्रांची तपासणी करण्याची पूर्ण मुभा देणे, 440 किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेच्या स्वाधीन करणे आणि अणू संवर्धन कार्यक्रम कायमचा बंद करणे यांचा समावेश आहे. तसेच, इराणने आपल्या क्षेपणास्त्रांचा साठा सार्वजनिक करावा, लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांवर नियंत्रण ठेवावे आणि 'हिजबुल्लाह, हमास, हुथी' यांसारख्या प्रॉक्सी संघटनांना मिळणारी मदत थांबवून त्या नष्ट कराव्यात, अशी मागणी अमेरिकेने केली.

याशिवाय, इराणच्या अत्यंत शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कोर' (IRGC) या दलाला विसर्जित करण्याची आणि 'अब्राहम करारा'वर स्वाक्षरी करण्याची अटही यात आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीला आंतरराष्ट्रीय मार्ग म्हणून मान्यता देऊन तिथून आपला ताबा हटवणे, ही अमेरिकेची सर्वात महत्त्वाची अट मानली जात आहे.

Donald Trump 10 Conditions For Iran
Iran US War Ceasefire: "इराणमध्ये सत्तापालट होणार!" ट्रम्प यांचा मोठा दावा; शस्त्रसंधीनंतर अमेरिकेची अण्वस्त्र तळांवर नजर

दुसरीकडे, इराणनेही (Iran) अमेरिकेसमोर आपले प्रस्ताव ठेवले आहेत. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जहाजांना सुरक्षितपणे बाहेर पडू देण्याची तयारी इराणने दर्शवली आहे, परंतु त्यासाठी अमेरिकेने इराणवर लादलेले निर्बंध उठवावेत आणि युद्धविराम करावा, अशी अट घातली. इराणने आपला अणू कार्यक्रम ऊर्जेसाठी असल्याचे सांगत तो 5 वर्षांसाठी स्थगित करण्याची तयारी दर्शवली असून रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी इराणचे युरेनियम स्वतःच्या देखरेखीत ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, अमेरिका हे युरेनियम रशियाकडे नव्हे तर स्वतःकडे सोपवण्यावर ठाम आहे.

Donald Trump 10 Conditions For Iran
US Iran War: डेडलाईन संपण्यापूर्वीच अमेरिकेचा मोठा हल्ला! इराणी सैन्याचं अंडरग्राउंड हेडक्वार्टर उद्ध्वस्त; बंकर-बस्टर बॉम्बच्या वर्षावानं चुकला काळजाचा ठोका

इराणसाठी या अटी मान्य करणे म्हणजे एकप्रकारे अमेरिकेची गुलामी स्वीकारण्यासारखे आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. इराणनेही बदल्यात आपली गोठवलेली मालमत्ता परत देणे, युद्धाच्या नुकसानीची भरपाई आणि भविष्यात पुन्हा हल्ला न करण्याची लेखी हमी अमेरिकेकडून मागितली आहे. ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि इराणच्या रणनीतिक स्वाभिमानामुळे ही शांतता चर्चा नेमकी कोणत्या वळणावर जाते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेने (America) दिलेला हा 'फायनल ऑफर' इराण स्वीकारणार की युद्धाचा नवा भडका उडणार, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com