VIDEO: ''मला इराणचा सुप्रीम लीडर होण्याची ऑफर...'', डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक खुलासा; युद्धविरामाच्या चर्चेत नवा वाद

Donald Trump Iran Supreme Leader Claim: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र दावा करुन खळबळ उडवून दिली.
Donald Trump Iran Supreme Leader Claim
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

Donald Trump Iran Supreme Leader Claim: मध्य पूर्वेत सुरु असलेल्या भीषण युद्धाला आज (गुरुवारी) 27 दिवस पूर्ण झाले. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या हत्येनंतरही इराणने अमेरिका आणि इस्रायलविरुद्धचा आपला लढा सुरुच ठेवला आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे लागलेले असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र दावा करुन खळबळ उडवून दिली. ट्रम्प यांनी म्हटले की, इराणने त्यांना चक्क देशाचे 'सुप्रीम लीडर' बनण्याची ऑफर दिली होती, जी त्यांनी हसण्यावारी नेत धुडकावून लावली.

एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दावा केला की, अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम घडवून आणण्यासाठी पडद्यामागे चर्चा सुरु आहे. याच अनौपचारिक चर्चेदरम्यान इराणमधील काही महत्त्वाच्या व्यक्तींनी त्यांना विचारले की, "तुम्हीच आमचे पुढचे सुप्रीम लीडर का बनत नाही?" ट्रम्प यांनी हसत हसत हा किस्सा सांगताना स्पष्ट केले की, जगातील कोणताही नेता इराणचा सर्वोच्च नेता बनण्याची इच्छा धरणार नाही. मात्र, इराणने ट्रम्प यांचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून अशा प्रकारची कोणतीही ऑफर देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले.

Donald Trump Iran Supreme Leader Claim
Iran US Israel War: इराणवर आतापर्यंतचा सर्वात भीषण प्रहार! 'युद्ध आमच्याच अटींवर संपणार', अमेरिकन संरक्षण सचिवांची गर्जना

युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल बोलताना ट्रम्प यांनी विजयाचा मोठा दावा केला. "अमेरिकेने इराणचा (Iran) इतका भीषण पराभव केला की, असा विजय जगाने यापूर्वी कधीही पाहिला नसेल," असे ते म्हणाले. ट्रम्प यांच्या मते, इराण आता युद्धविरामासाठी अत्यंत उत्सुक आहे, परंतु त्यांना स्वतःच्याच जनतेची भीती वाटत आहे. जर इराणने अमेरिकेच्या अटींवर करार केला, तर तेथील लोक आपल्याच नेत्यांना संपवून टाकतील, अशी भीती ट्रम्प यांनी व्यक्त केली. तसेच, स्वतः अमेरिकेलाही या कराराबाबत काही शंका असल्याचे त्यांनी सूचित केले.

Donald Trump Iran Supreme Leader Claim
Israel US Iran War : 19 दिवसांत इराणच्या 40 बड्या नेत्यांचा खात्मा! लारीजानींनंतर गुप्तचर मंत्री इस्माइल खातिबही ठार; इस्रायलची 'ऑपरेशन हंट' मोहीम यशस्वी

या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणसमोर 15 कलमी प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावात प्रामुख्याने इराणने आपला आण्विक कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा, हिजबुल्लाहसारख्या दहशतवादी गटांना मिळणारी मदत थांबवावी आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' हा सागरी मार्ग पुन्हा व्यापारासाठी खुला करावा, अशा कडक अटींचा समावेश आहे. मात्र, इराणने या अटी मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला.

Donald Trump Iran Supreme Leader Claim
Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका मुलाखतीत ट्रम्प यांच्या विधानांचा समाचार घेतला. "ट्रम्प नक्की कोणाशी बोलत आहेत? ते स्वतःशीच संवाद साधत आहेत का?" असा उपरोधिक सवाल त्यांनी केला. इराणने ठामपणे सांगितले की, ते अमेरिकेसोबत सध्या किंवा भविष्यात कधीही कोणताही करार करणार नाहीत. नेत्यांच्या हत्येनंतर इराणमधील असंतोष शिगेला पोहोचला असून अमेरिकेच्या 15 कलमी प्रस्तावाला त्यांनी कचऱ्याची टोपली दाखवली. त्यामुळे मध्य पूर्वेत सुरु असलेल्या या संघर्षात शांतता प्रस्थापित होण्याऐवजी तणाव अधिकच वाढताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com