UK: भारतीय वंशाचा मास्टरमाइंड गजाआड, यूकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कर चुकवेगिरीसाठी दोषी!

UK News: मुख्य सूत्रधार भारतीय वंशाचा आरिफ पटेल याला यूकेमध्ये करचुकवेगिरीप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.
Arrested
ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

UK Fake Designer Clothing Scam: बनावट डिझायनर वेअर घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार भारतीय वंशाचा आरिफ पटेल याला यूकेमध्ये करचुकवेगिरीप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.

दरम्यान, पटेल याच्यावर गुन्हेगारी टोळीशी संगनमत करुन कपडे आणि मोबाईल फोनच्या फसव्या निर्यातीवर व्हॅट प्रतिपूर्तीचा दावा करुन £97 दशलक्ष कर चुकविल्याचा आरोप होता. यूकेच्या टॅक्स डिपार्टमेंटने पटेलला देशाच्या इतिहासातील फसव्या करचोरी प्रकरणांपैकी एक म्हणून दोषी ठरवले.

Arrested
Israel: अल-अक्सा मस्जिद वादावर PM नेत्यान्याहू यांचा मोठा निर्णय; म्हणाले...

14 आठवडे सुनावणी चालली

चेस्टर क्राऊन कोर्टाने मंगळवारी पटेलला सरकारी महसूल बुडवण्याचा कट, ब्रँडच्या नावाखाली बनावट कपडे विकणे आणि 14 आठवड्यांच्या खटल्यानंतर मनी लाँड्रिंगसाठी (Money Laundering) दोषी ठरवले.

'लोकांच्या खर्चावर तो विलासी जीवन जगला'

रॉयल रेव्हेन्यू अँड कस्टम्स (एचएमआरसी) मधील तपास सेवेचे संचालक रिचर्ड लास म्हणाले की, "आरिफ पटेल कायद्याचे पालन करणार्‍या लोकांच्या खर्चावर विलासी जीवन जगत होता." या टोळीने ब्रिटनमधील (Britain) 78 दशलक्ष पौंडहून अधिक मालमत्ता बळकावली असून ही रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Arrested
जेरुसलेमच्या अल-अक्सा मशिदीत पुन्हा चकमक, 24 जण जखमी, तिघांना अटक

पुढील महिन्यात सत्याचा खुलासा होणार

या प्रकरणातील सहआरोपी, दुबईचा 58 वर्षीय मोहम्मद जफर अली यालाही या आठवड्यात संपलेल्या खटल्यात कट रचणे आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी दोषी ठरविण्यात आले. याप्रकरणी आरिफ आणि अली यांना पुढील महिन्यात शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com