Congo Ebola Outbreak: कांगोत इबोला व्हायरसचा हाहाकार! 20 दिवसात 1000 जणांचा मृत्यू, 4000 हून अधिक लोक मृत्यूच्या दाढेत; 10 वर्षांतील सर्वात मोठा उद्रेक

Congo Ebola Epidemic Death Toll 2000: डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो या मध्य आफ्रिकेतील देशात इबोला व्हायरसचा उद्रेक झाल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांच्या आत 2 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला.
Congo Ebola Epidemic Death Toll 2000
Congo Ebola OutbreakDainik Gomantak
Published on
Updated on

Congo Ebola Epidemic Death Toll 2000: डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो या मध्य आफ्रिकेतील देशात इबोला व्हायरसचा उद्रेक झाल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांच्या आत 2 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. अल जजीराने सरकारी आकडेवारीचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, हा विषाणू अत्यंत वेगाने पसरत असून, एकूण मृत्यूपैकी तब्बल 1 हजार मृत्यू हे गेल्या अवघ्या तीन आठवड्यांत झाले आहेत.

मंगळवारपर्यंत कांगोच्या 5 प्रांतांमध्ये इबोलाचे एकूण 4 हजार 381 रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी 2 हजार 11 जणांचा मृत्यू झाला. कांगोच्या इतिहासातील हा 10 वर्षांतील दुसरा सर्वात मोठा आणि आतापर्यंतचा सर्वात वेगाने पसरणारा प्रकोप ठरला. यापूर्वी 2014 ते 2016 दरम्यान पश्चिम आफ्रिकेत इबोलाने कहर केला होता, ज्यामध्ये 11 हजार 310 लोकांचा बळी गेला होता.

Congo Ebola Epidemic Death Toll 2000
Congo Ebola Outbreak 2026: इबोलाच्या नव्या उद्रेकानं आफ्रिकेत माजवला हाहाकार, काँगोमध्ये 65 जणांचा मृत्यू; 246 संशयित रुग्णांमुळे हादरली आरोग्य यंत्रणा!

गेल्या वीस दिवसांत 1 हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय आरोग्य यंत्रणांनी तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले. संयुक्त राष्ट्राचे वरिष्ठ इबोला समन्वयक जूलियन हार्नीस यांनी 'X' वर चिंता व्यक्त करताना सांगितले की, मृतांचा आकडा 2 हजारांच्या पार गेला असून यातील निम्मे मृत्यू अवघ्या 20 दिवसांतील आहेत. हा प्रसार रोखण्यासाठी आणि मानवी जीव वाचवण्यासाठी सर्व मदत पुरवणाऱ्या संस्था, सरकार आणि स्थानिक समुदायाला आजपासूनच अधिक वेगाने एकत्र काम करावे लागेल.

Congo Ebola Epidemic Death Toll 2000
Congo: धगधगती घरे अन् किंकाळ्यांनी हादरले 'कांगो'! दहशतवाद्यांनी 43 निष्पापांचा घेतली जीव; युगांडा सीमेवर पुन्हा रक्ताची होळी

दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटना (WHO) या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि आरोग्य सेवा टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर सातत्याने प्रयत्न करत आहे. 'डब्ल्यूएचओ'ने स्थानिक प्रसूती कक्षासाठी 20 बेड दान केले असून, 100 हायजीनिस्ट, 100 सर्वेक्षण अधिकारी, 4 डीकंटॅमिनेशन टीम आणि 2 अंत्यसंस्कार टीम तयार करुन त्यांना विशेष प्रशिक्षण दिले आहे.

Congo Ebola Epidemic Death Toll 2000
Congo: काँगोत बंडखोरांचा हैदोस, 130 नागरिक ठार; 22 महिलांवर बलात्कार...

आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी कांगोमधील 'लिटा' येथील उपचार केंद्राचा विस्तार करण्यात येत असून, बेडची क्षमता 40 वरुन थेट 80 म्हणजेच दुप्पट करण्यात येत आहे. या मोहिमेत कांगोचे आरोग्य मंत्रालय, युनिसेफ, अलिमा, वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि मोन्युस्को यांसारख्या मानवतावादी संस्था मदत करत आहेत. यापूर्वी मे महिन्यात इबोला बाधितांची संख्या 900 च्या पार गेली होती, जी आता काही महिन्यांतच 4 हजारांच्या पुढे गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com