America Ban TikTok: चीनी हेरगिरीच्या संशयाने अमेरिकेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'या' अ‍ॅपवर बंदी

सिनेटमध्ये विधेयक मंजूर; हे अ‍ॅप चीनचा धोकादायक व्हायरस असल्याची टीका
Ban on Mobile apps
Ban on Mobile appsDainik Gomantak
Published on
Updated on

America Ban TikTok: अमेरिकेत सिनेटने राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत एक विधेयक मंजूर केले आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या टिकटॉक हे अ‍ॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यूएस अधिकारी आणि दोन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी टिकटॉकच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

रिपब्लिकन सिनेटर जोश हॉले यांनी टिकटॉकला चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा धोकादायक व्हायरस म्हटले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर ते म्हणाले की, जोपर्यंत कंपनी चीनसोबतचे सर्व संबंध तोडत नाही, तोपर्यंत सरकारी उपकरणांमध्ये त्याला स्थान मिळणार नाही.

Ban on Mobile apps
Nirav Modi Extradition: नीरव मोदीला न्यायालयाचा मोठा झटका, भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अ‍ॅबॉट यांनी गेल्या आठवड्यातच सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी टिकटॉक वापरण्यास बंदी घातली होती. यामागे देशाची सुरक्षा हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आणखी अनेक राज्ये असेच करण्याची शक्यता आहे.

मंगळवारी, रिपब्लिकन पक्षाचे रुबियो आणि माईक गॅलाघर तसेच डेमोक्रॅटिक पक्षाचे राजा कृष्णमूर्ती यांनी अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्याचा प्रस्ताव सिनेटमध्ये मांडला. अमेरिकेत टिकटॉकची चौकशी सुरू आहे अमेरिकेची फॉरेन इन्व्हेस्टमेंट कमिटी सध्या टिकटॉक अ‍ॅपची चौकशी करण्यात व्यस्त आहे. ज्यामध्ये टिकटॉक राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे की नाही हे तपासले जात आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये, यूएस खासदारांनी अ‍ॅपच्या कार्यपद्धतीशी संबंधित अनेक प्रश्न विचारून टिकटॉकच्या अधिकाऱ्याचा वर्ग घेतला. ज्यामध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, तपास पूर्ण झाल्यानंतर जो अंतिम करार केला जाईल तो राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सर्व भीती दूर करेल.

Ban on Mobile apps
United Nation: संयुक्त राष्ट्रपरिषदेत काय म्हणाले भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर

रिपोर्टनुसार, अमेरिकेत नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये बायडेन यांनी प्रचारासाठी टिकटॉक इन्फ्लुएन्सरचा पाठिंबा घेतला होता. अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान त्यांनी टिकटॉक आणि चीनवर अमेरिकेची सुरक्षा अनेक प्रकारे धोक्यात आणल्याचा आरोप केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com