Surrogacy News
Surrogacy News Dainik Gomantak

USA: अहो अश्चर्यम! 56 वर्षीय महिलेने सून आणि मुलाच्या बाळाला दिला जन्म

महिलेच्या सुनेची हिस्टरेक्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
Published on

USA Surrogacy News: सरोगसी बाबत अनेक घटना तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला, वाचायला मिळतील. अनेरिकेत नुकतीच एक वेगळी घटना समोर आली आहे. एका 56 वर्षीय महिलेने सरोगेट बनून चक्क आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या बाळाला जन्म दिला आहे. द पीपलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या महिलेच्या सुनेची हिस्टरेक्टॉमी शस्त्रक्रिया (गर्भाशयाचा सर्व किंवा काही भाग काढून टाकणे) करण्यात आली. त्यामुळे 56 वर्षीय महिलेने सरोगसीचा धाडसी निर्णय घेतला.

Surrogacy News
Tirupati Temple Property: 2.3 लाख कोटींची मालमत्ता, अनेक टन सोने, दागिने; तिरूपतीची संपत्ती पाहून तुमचे डोळे चक्रावतील

नॅन्सी हॉक असे या 56 वर्षीय महिलेचे नाव आहे. नॅन्सी हॉक यांनी त्यांचा मुलगा जेफ हॉक आणि जेफची पत्नी कॅंब्रिया यांच्यासमोर सरोगसीचा पर्याय ठेवला. नॅन्सी यांनी आव्हान स्विकारून एका बाळाला जन्म दिला. हॉक यांच्या घरात आलेल्या लहान मुलामुळे हॉक कुटुंबीय आनंदात आहेत. जेफ हॉक एक वेब डेव्हलपर असून, त्यांना हा संपूर्ण क्षण त्यांच्यासाठी अविस्मरणीय असल्याचे म्हटले आहे.

Surrogacy News
T20WC: भारत इन, आफ्रिका आऊट! नेदरलँडचा दक्षिण आफ्रिकेला चकवा

दरम्यान, नॅन्सी हॉक यांनी एका मुलीला जन्म दिला आहे. या मुलीचे नाव हन्ना असे ठेवण्यात आले आहे. नॅन्सी हॉक यांना मुलगीच होणार असा अंदाज एका विश्व विद्यालयात काम करणाऱ्या वृद्ध महिलेने व्यक्त केला होता. अशी माहिती द पीपलने प्रसिद्ध केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com