ड्रॅगन VS अमेरिका, जगभरातील टॅलेंटला चीन करतोय आकर्षित

चीन (China) आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी 'जागतिक भर्ती धोरणा' वर काम करत आहे.
China
ChinaDainik Gomantak
Published on
Updated on

चीन आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी 'जागतिक भर्ती धोरणा' वर काम करत आहे. पाश्चात्य देशांतील प्रतिभावंताना आमंत्रित करुन अमेरिकेच्या जागतिक नेतृत्वाला आव्हान देण्याचा चीनचा उद्देश आहे. जर यामध्ये चीन यशस्वी झाला, तर तो यूएस आणि इतर पाश्चात्य देशांकडून भरती करत असलेल्या प्रतिभावंताना तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यात मदत करेल. त्याच वेळी, चीनला आर्थिक, राजकीय आणि लष्करी दृष्ट्या अमेरिकेला मागे टाकण्यास सक्षमता सिध्द होईल.

दरम्यान, हे पाहता अमेरिकेला (America) चीनच्या या रणनीतीपासून सावध राहावे लागणार आहे. तसेच जो बायडन (Joe Biden) प्रशासनाने अधिक प्रभावी धोरण आखण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अधिक प्रभावी इमिग्रेशन धोरण समाविष्ट आहे, जे जगातील प्रतिभावंताना आकर्षित करते.

China
रशियाच्या मित्र देशाला ड्रॅगन देणार क्षेपणास्त्रे, काय आहे चीनची रणनिती?

ही दीर्घकालीन रणनीती

ही रणनीती दिर्घकाळापासून सुरु आहे. 1950 च्या दशकात, चीनी कम्युनिस्ट पक्ष (CCP) पश्चिमेकडील शेकडो शास्त्रज्ञांना आकर्षित करण्यात यशस्वी झाला आहे. याच शास्त्रज्ञांनी चीनसाठी 1964 मध्ये अणुबॉम्ब आणि 1967 मध्ये हायड्रोजन बॉम्ब तयार केला होता. 1970 मध्ये त्यांनी चीनचा (China) पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यास मदत केली.

China
'ड्रॅगन' चा नवा विक्रम, एकाच वेळी 22 उपग्रह प्रक्षेपित केले प्रक्षेपित

1999 मध्ये चीनच्या 'जागतिक भरती धोरणा' वर बराच गदारोळ झाला होता. खरं तर, CCP ने कार्यक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या लोकांना 23 राष्ट्रीय पदके दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com