भारत-चीन तणाव पुन्हा वाढणार ? चीनकडून पँगॉन्ग तलावावर पुन्हा बांधकाम

परराष्ट्र मंत्रालयाने यावर बोलण्यास दिला नकार
China  New Construction
China New ConstructionDainik Gomantak

भारत आणि चीन यांच्यातील तणाव पुन्हा वाढीस लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कारण नुकत्याच घेतलेल्या सॅटेलाइट फोटोंवरून पूर्व लडाखमधील पँगॉन्ग तलावाभोवती चीन दुसरा मोठा पूल बांधत असल्याचं समोर आलंय. हा भाग चीनच्या ताब्यात आहे. भारत आणि चीन यांच्यात तणावाचं वातावरण असताना चीनने हा पूल बांधला आहे.

डेट्रस्फाने जी सॅटेलाईट इमेजनुसार हा दुसरा पूल पहिल्या पुलाच्या जवळ आहे. दुसरा पूल पँगॉन्ग तलावाच्या उत्तर आणि दक्षिणेकडून बनवण्यात येणार आहे. हा पूल पहिल्या पुलाच्या अगदी जवळ आहे. याचे काम चीनने काही दिवसांपूर्वी पूर्ण केले होते. या विषयी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची म्हणाले, पुलासंदर्भात मी रिपोर्ट पाहिला आहे. हा सैन्याचा मुद्दा आहे. यावर मी काही बोलणार नाही.

China  New Construction
SC ने पेगासस प्रकरणाच्या चौकशी समितीचा 4 आठवड्यांनी वाढवला कालावधी

या भागाला आम्ही भारताचे अधिकृत क्षेत्र मानतो. या विषयी आम्ही चिनशी बोलत असून यातून समाधनकारक उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान असे मानले जाते की, चीनी सैनिक येण्या-जाण्यासाठी वेगवेगळ्या पुलांचा वापर करत आहे. किंवा एक पूल सैनिकांसाठी आणि दुसरा पूल टँक, आर्मी पर्सनल कॅरिअर आणि दुसरा आर्मीच्या वाहनांसाठी वापरण्यात येण्याची शक्यता आहे.

यापुर्वी ही चिनने केला घुसखोरीचा प्रयत्न

संपूर्ण जगात कोरोनाच्या विळख्यात अडकले असताना चीनने लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता. पँगॉन्ग तलावाजवळ असणाऱ्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर वाद झाला होता. भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या सीमावादामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात बांधकाम करण्यास आक्षेप घेतला जातो.

China  New Construction
नरेंद्र मोदींना आव्हान देण्याची क्षमता राहुल गांधींमध्ये आहे का? प्रशांत किशोरांनी दिलं उत्तर

दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्याकडून आपल्या हद्दीत रस्ते बांधणीचे काम सुरू केले होते. त्यावर चीनने आक्षेप घेतला होता. त्यानंतर तणाव निर्माण झाला होता. त्याच्या काही दिवसांनी चीनच्या सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. त्यानंतर भारतीय सैन्याने चीनच्या आगळकीला विरोध केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com