चीनची लडाखमध्ये लष्करी तयारी, अमेरिकन जनरलच्या दाव्यावर उडाला चीनचा भडका

भारत-चीन सीमेवर लष्करी अडथळे स्थिर होत आहेत असा दावा बीजिंगने केला आहे.
China-India
China-IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

बीजिंग: अमेरिकेच्या सर्वोच्च लष्करी जनरलने लडाखबाबत केलेल्या दाव्यावर चीनने काहीशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत आणि चीनमध्ये संवादाद्वारे सीमाप्रश्न योग्यरित्या सोडवण्याची इच्छा आणि क्षमता आहे, असे म्हणत अमेरिकेने आगीत तेल टाकून प्रादेशिक शांतता बिघडवल्याचा आरोपही चीनने केला आहे. भारत-चीन सीमेवर लष्करी अडथळे स्थिर होत आहेत असा दावा बीजिंगने केला आहे. (China-India Ladakh Border)

खरं तर, एक दिवस आधी, यूएस आर्मी पॅसिफिक कमांडिंग जनरल चार्ल्स ए. फ्लिन म्हणाले होते की, लडाखमध्ये भारताच्या सीमेजवळ चीनकडून काही संरक्षण पायाभूत सुविधांची स्थापना चिंताजनक आहे आणि या भागातील चिनी कारवाया डोळे उघडवणाऱ्या आहेत.

China-India
पाकिस्तानचे प्रसिद्ध टीव्ही होस्ट अन् खासदार अमीर लियाकत यांचे निधन

सीमा विवाद संवादाद्वारे सोडवू

बीजिंगमध्ये नियमित मीडिया ब्रीफिंगमध्ये, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले की, हा सीमाप्रश्न चीन आणि भारत यांच्यातील आहे. दोन्ही बाजूंकडे संवादाद्वारे प्रश्न योग्यरित्या सोडवण्याची इच्छाशक्ती आणि क्षमता आहे. अमेरिकन अधिकारी आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि चिनकडे बोटं दाखवत आहेत. हे घृणास्पद कृत्य अमेरिका करत असल्याचा आरोप लिजियान यांनी केला आहे.

सीमेवरील अनेक मुद्द्यांवर एकमत

चीनच्या प्रवक्त्याने पुनरुच्चार केला की पूर्व लडाखमधील परिस्थिती, जिथे दोन वर्षांहून अधिक काळ दोन्ही बाजूंमध्ये लष्करी अडथळे होते मात्र आता परिस्थिती स्थिर होत आहे. चीन-भारत सीमेच्या पश्चिमेकडील बहुतांश भागातून दोन्ही देशांच्या आघाडीच्या सैन्याने माघार घेतल्याचा दावाही त्यांनी केला. असे असूनही सीमेवर असे अनेक पॉईंट्स अजूनही आहेत, जिथे भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर उभे आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, दोन्ही देशांमध्ये लष्करी चर्चेच्या किमान 13 फेऱ्याही झाल्या आहेत.

China-India
Maryland कारखान्यात गोळीबार, 3 ठार, 1 सैनिक अन् हल्लेखोर जखमी

भारत दौऱ्यावर आलेल्या अमेरिकन सैन्याच्या पॅसिफिक क्षेत्राचे कमांडिंग जनरल चार्ल्स ए. फ्लिन यांनी येथे पत्रकारांना सांगितले की, भारताच्या सीमेजवळ चीनकडून उभारण्यात येत असलेल्या संरक्षण पायाभूत सुविधा चिंताजनक आहेत. या क्षेत्रातील चीनच्या कारवाया डोळे उघडणाऱ्या आहेत. भारताच्या सीमेजवळ चीनकडून उभारण्यात येत असलेल्या काही संरक्षण पायाभूत सुविधा ही चिंतेची बाब आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com