अमेरिकेत (America) वेगवेगळ्या ठिकाणी उघड गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत, ज्यामध्ये निष्पाप लोक मारले जात आहेत. याच क्रमात अमेरिकेतील स्मिथ्सबर्गमधील मेरीलँड शहरात (Maryland open shooting) उघड गोळीबार झाल्याची घटना समोर आली, ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. उत्तर मेरीलँडमधील एका मॅन्युफॅक्चरिंग प्लांटवर गुरुवारी एका बंदुकधारी व्यक्तीने गोळीबार केला, ज्यात किमान तीन जण ठार झाले आणि अन्य गंभीर जखमी झाले असून अशी बातमी एएनआयने मेरीलँड सरकारच्या हवाल्याने दिली आहे. त्याचवेळी, सीएनएनच्या वृत्तानुसार, राज्यपाल म्हणाले की त्यांना गोळीबारा बद्दलची माहिती नाही. (Maryland factory shooting kills 3 injures 1 soldier and attacker)
वॉशिंग्टन काउंटी शेरीफच्या प्रवक्त्याने सांगितले की, मेरीलँड राज्याच्या सैनिकासोबत झालेल्या गोळीबारामध्ये जखमी झालेला हल्लेखोर, ज्याची लगेच ओळख पटली नाही, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. गोळीबारानंतर संशयित हल्लेखोर आणि जवान दोघांनाही स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. वॉशिंग्टन काउंटी शेरीफ कार्यालयाने सांगितले की, बिकल रोडच्या 12900 ब्लॉकजवळ गुरुवारी दुपारी 2:30 वाजता हा गोळीबार झाला. नुकतेच खुलेआम गोळीबार झाल्याची घटना देखील समोर आली आहे, न्यूयॉर्क, टेक्साससह अनेक भागात गोळीबार करण्यात आला आणि निष्पाप लोकांना यामुळे आपला जीव गमवावा लागला.
अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये शनिवारी रात्री उशिरा एका बंदूकधाऱ्याने जमावावर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या घटनेत आतापर्यंत किमान 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. अमेरिकन न्यूज चॅनल एनबीसीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्रीनंतर घडली आहे. यात अनेक बंदूकधारी सामील असल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यातील तुलसा येथील रुग्णालयाच्या संकुलात एका तरुणाने गोळीबार केला, ज्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. यासोबतच हल्लेखोरही मारला गेला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.