पाकिस्तानचे प्रसिद्ध टीव्ही होस्ट अन् खासदार अमीर लियाकत यांचे निधन

पाकिस्तानचे प्रसिद्ध टीव्ही होस्ट आणि खासदार अमीर लियाकत हुसैन यांचे निधन झाले आहे.
Famous Pakistani TV host and MP Amir Liaquat
Famous Pakistani TV host and MP Amir Liaquat Dainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानचे प्रसिद्ध टीव्ही होस्ट आणि खासदार अमीर लियाकत हुसैन यांचे निधन झाले आहे. ते 49 वर्षांचे होते. अमीर लियाकत हुसैन आज कराचीतील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले. लियाकत यांची प्रकृती पहाटेच बिघडली, त्यानंतर त्यांना आगा खान विद्यापीठ रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना नंतर मृत घोषित करण्यात आले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, प्राथमिक अहवालात कोणताही गैरप्रकार दिसून आलेला नाही.

दरम्यान, खासदार अमीर लियाकत हुसैन यांचे पोस्टमार्टम जिना वैद्यकीय केंद्रात केले जाईल. दरम्यान, एमएनए अमीर लियाकत हुसेन यांच्या निधनाची बातमी मिळताच राष्ट्रीय असेंब्लीचे अध्यक्ष राजा परवेझ अश्रफ यांनी आजपासून सुरु झालेले अधिवेशन (Convention) शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब केले.

Famous Pakistani TV host and MP Amir Liaquat
कर्जमाफीसाठी पाकिस्तान विकतोय शेळ्या, वाचा संपूर्ण प्रकरण

तसेच, लियाकत मार्च 2018 मध्ये पीटीआयमध्ये (PTI) सामील झाले होते. त्या वर्षाच्या उत्तरार्धात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते कराचीमधून खासदार म्हणून निवडून आले होते. परंतु, नंतर त्यांनी पक्षाला राम-राम ठोकला. दरम्यान, आमीर लियाकत हुसैन यांच्या निधनाचे वृत्त मिळताच राष्ट्रीय असेंब्लीचे अध्यक्ष राजा परवेझ अश्रफ यांनी आजपासून सुरु झालेले अधिवेशन शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब केले.

Famous Pakistani TV host and MP Amir Liaquat
''पाकिस्तान भारतासोबतच्या व्यापारासाठी प्रयत्नशील'' पण ...

शिवाय, लियाकत मार्च 2018 मध्ये पीटीआयमध्ये सामील झाले होते. त्या वर्षाच्या उत्तरार्धात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते कराचीमधून (Karachi) खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, नंतर त्यांनी पक्ष सोडला. ते यापूर्वी मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट (MQM) चे प्रमुख नेते होते. ऑगस्ट 2016 मध्ये त्यांनी पक्ष सोडला. त्याचवेळी आपण राजकारण सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. लियाकत अनेक वर्षे मीडिया इंडस्ट्रीत कार्यरत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com