Haiti Violence: कॅरेबियन देश हैती हिंसाचाराच्या विळख्यात; अमेरिकेने दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले

Haiti Violence: कॅरेबियन देश हैतीमध्ये हिंसाचार सुरुच आहे. दरम्यान, अमेरिकेने आपल्या दूतावासातील अनेक कर्मचाऱ्यांना परत बोलावले आहे.
Haiti Violence
Haiti ViolenceDainik Gomantak

Haiti Violence: कॅरेबियन देश हैतीमध्ये हिंसाचार सुरुच आहे. दरम्यान, अमेरिकेने आपल्या दूतावासातील अनेक कर्मचाऱ्यांना परत बोलावले आहे. हैती गृहयुद्धाच्या विळख्यात आहे. अशा परिस्थितीत वाढत्या हिंसाचार आणि आणीबाणीमुळे अमेरिकन लष्कराने आपल्या दूतावासातून अनेक कर्मचाऱ्यांना परत बोलावले आहे. त्यासाठी रितसर ऑपरेशन राबवण्यात आले. हिंसाचारात वाढ झाल्याने, सरकारला धोका निर्माण झाल्याने आणि मोठ्या प्रमाणात विस्थापनांना प्रोत्साहन दिल्यानंतर अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला, सशस्त्र टोळ्यांनी हैतीच्या (Haiti) दोन सर्वात मोठ्या तुरुंगांवर हल्ला केला होता. त्यामुळे हजारो कैदी तुरुंगातून पळून गेले. सशस्त्र टोळीने या काळात हैतीचे पंतप्रधान एरियल हेन्री यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती. दुसरीकडे, हैतीचे पंतप्रधान देश सोडून पळून गेले आहेत आणि संयुक्त राष्ट्र समर्थित सुरक्षा दलांच्या हस्तक्षेपासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे विनंती करत आहेत.

Haiti Violence
Haiti Violence: हैतीत उसळला हिंसाचार, तुरुंगातून पळाले 4 हजार कैदी; आणिबाणी लागू

यूएस सदर्न कमांडने स्पष्ट केले की, दूतावासातील कर्मचाऱ्यांना (Employees) परत बोलावणे केवळ दूतावासाच्या सुरक्षेसाठी करण्यात आली आहे. दूतावासातील आणि बाहेरील कर्मचाऱ्यांची ही एअरलिफ्ट जगभरातील दूतावासाची सुरक्षा वाढवण्यासाठी आमच्या मानक अभ्यासाशी सुसंगत आहे. यादरम्यान, लष्करी विमानात एकही हैतीयन नागरिक नव्हता."

युरोपियन युनियनच्या प्रतिनिधी मंडळाने सुरक्षेच्या कारणास्तव हैतीमधील आपली उपस्थिती तात्पुरती कमी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर्मनी आणि युरोपियन युनियनचे दूतावासही आपल्या कर्मचाऱ्यांना येथून बाहेर काढत आहेत.

दुसरीकडे, कॅरेबियन देश हैतीमध्ये गृहयुद्धाच्या हिंसाचाराच्या आगीत परिस्थिती बिघडत चालली आहे. देशात हिंसाचारामुळे 3,62,000 हैती नागरिकांना विस्थापित व्हावे लागले. सशस्त्र टोळ्यांनी देशाची राजधानी काबीज केली आहे. ते राष्ट्रपती भवनासह अनेक सरकारी इमारतींना लक्ष्य करत आहेत. रस्त्यावर गोळ्या झाडल्या जात आहेत. सशस्त्र टोळ्यांनी दुकाने आणि घरांची तोडफोड केल्याने हैतीमध्ये 72 तासांसाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

Haiti Violence
Violence In Haiti: हैतीमध्ये भयानक हिंसाचार, 530 हून अधिक लोकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली चिंता

दरम्यान, हैतीमध्ये अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. रविवारी रात्री येथे एवढे मोठे हिंसक आंदोलन झाले की, तुरुंगाचे कुलूप तो़डून सुमारे चार हजार कैदी पळून गेले. या कैद्यांमध्ये अनेक खुनी, अपहरणकर्ते आणि गुन्हेगारांचा समावेश आहे. संपूर्ण देशात 72 तासांसाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे. आता सरकारने फरार लोकांना अटक करण्याची घोषणा केली आहे. हैतीमध्ये अनेक कुख्यात गॅंग आहेत, ज्या हिंसाचारासाठी जबाबदार आहेत.

हैती सरकारचे म्हणणे आहे की, पोलिस (Police) कर्मचाऱ्यांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नात अनेक कर्मचारी जखमी झाले. जिमी चेरिजियर यांनी सुरुवातीला सरकारच्या विरोधाचा मार्ग स्वीकारला होता पण नंतर त्यांच्या गॅंगने हिंसाचाराचा अवलंब केला. वृत्तानुसार, हिंसाचारानंतर कैद्यांचे मृतदेह तुरुंगात पडलेले आढळले. गॅंगच्या हल्ल्यात अनेक कैद्यांचा मृत्यूही झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com