Taliban: खबरदार विद्यापीठात जाल तर!तालिबान्यांचा अफगाणी मुलींसाठी नवा फतवा

Taliban: आता तालिबानने मुलींनी उच्चस्तरीय जाऊन शिक्षण घेऊ नये असा नवीन नियम काढला आहे.
Taliban
Taliban Dainik Gomantak
Published on
Updated on

Taliban: अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून सामान्य नागरिकांच्या जीवनात अनेक बदल झाले आहेत.सामान्य नागरिकांना अनेक जाचक नियमांना सामोरे जावे लागत आहे. आता तालिबानने मुलींनी उच्चस्तरीय जाऊन शिक्षण घेऊ नये असा नवीन नियम काढला आहे.

उच्च शिक्षण मंत्रालयाने याबाबतचे परिपत्रकही जाहीर केले आहे. या परिपत्रकात असेही नमूद केले आहे की, पुढचा अध्यादेश निघेपर्यत मुलींचे उच्चस्तरावरील शिक्षण निलंबित केले जावे.परिक्षेला अवघे तीन महिने राहिले असताना असा अध्यादेश निघणे म्हणजे मुलींच्या शिक्षणाबद्दलची स्वप्नांना बंदी घालण्यासारखे आहे.

Taliban
Corona Virus: लॉकडाउननंतर चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार-अमेरिकेने व्यक्त केली भीती

मागच्या वर्षी तालिबानने अफगानिस्तान (Afganistan ) वर ताबा मिळवल्यानंतर, मुलींना केवळ महिला प्रोफेसर किंवा वयोवृद्ध पुरुषांनी शिकवण्याची परवानगी तालीबानने दिली आहे. दरम्यान, याआधीच किशोरवयीन मुलींना शाळेत जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तालीबान( Taliban ) च्या या नव्या नियमावलीमुळे मुलींच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com