Charles Sobhraj: मैत्री, ड्रग्ज अन् मग खून...'चार्ल्स' बनला होता 9 देशांच्या पोलिसांसाठी डोकेदुखी

चार्ल्स याची कहानी एवढी रंजक आहे की त्याच्यावर वेब सिलिज आणि चित्रपट बनवण्यात आले आहे.
Charles Sobhraj
Charles SobhrajDainik Gomantak
Published on
Updated on

'बिकिनी किलर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या चार्ल्स शोभराजचे नाव आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण चार्ल्स शोभराजला वयोमानामुळे सुटकेचा आदेश दिला आहेत. 19 वर्षानंतर त्याची आज सुटका होणार आहे. दोन अमेरिकन पर्यटकांची हत्या केल्याच्या आरोपाखाली चार्ल्स 2013 पासून नेपाळच्या तुरुंगात आहे.

चार्ल्स शोभराज हे गुन्हेगारी जगातील प्रसिध्द नाव आहे. नेटफ्लिक्सवर चाल्स शोभाराज यांच्यावर एक डॉक्युमेंट्रीही र्लीज झाली आहे. तो चोरी आणि फसवणूक करण्यात माहीर होता. त्याला अनेक भाषांचे ज्ञान होते. तसेच डॅशिंग लुकमुळे तो सहज परदेशी मुलींना जाळ्यात अडकवत असे.

Charles Sobhraj
Charles Sobhraj: बिकनी किलर म्हणून ओळख असलेला चार्ल्स शोभराज कोण आहे!
  • 9 देशांच्या पोलिसांमागे डोकेदुखी

चार्ल्सच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे अनेक पोलिंसाची डोकेदुखी वाढली होती. भारत, नेपाळ, म्यानमार, थायलंड, फ्रान्स, इराण, ग्रीस आणि तुर्कीसह नऊ देशांचे पोलीस चार्ल्सला पकडण्यासाठी मागे लागले होते. पण त्याने चार देशांमध्येच तुरुगाची हवा खालाली आहे.

  • कोण आहे चार्ल्स शोभराज?

चार्ल्स शोभराज याचा जन्म व्हिएतनाममध्ये झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याने आग्नेय आशियातील जवळपास सर्वच देशांतील लोकांना विशेषत: मुलींना आपला शिकार बनवला आहे. चार्ल्स शोभराज हा चोरी आणि फसवणूक करण्यात माहीर आहे. त्याला 'बिकिनी किलर' म्हणून ओळखले जात होते.

शोभराजने दक्षिण आणि आग्नेय आशियातील किमान 20 पर्यटकांना ठार मारले आहे. तसेच यामध्ये 14 थायलंडमधील पर्यटकांचा समावेश आहे. 1976 ते 1997 या काळात त्याला भारतातील (India) तुरुंगात ठेवण्यात आले होते. मुलींशी मैत्री केल्यानंतर चार्ल्स त्यांना अंमली पदार्थ द्यायचा आणि त्यांची हत्या करत असे. परदेशी स्त्रिया त्याचा मुख्य बळी असायच्या. तो एवढा धूर्त होता आणि इतक्या चलाखीने गुन्हे करत असे की, त्याचा सुगावा लागण्याआधीच तो गुन्ह्यातून पसार व्हायचा.

  • तुरुंगातून घेतला होता मुलाखत

एकदा नेपाळच्या तुरुंगात कैद असलेल्या शोभराजने मुलाखत दिली होती. ही मुलाखत पाहून नेपाळ प्रशासनाला धक्का बसला होता. नेपाळच्या गृह मंत्रालयाने म्हटंले होते की कुठल्याही कैद्याला मिडियाला मुलाखत देता येत नाही.

  • असा बनला 'बिकनी किलर'

चार्ल्सने त्याच्या एक भारतीय साथीदारा अजय चौधरी याच्यासह मिळून थायलंडमध्ये पहिला खुन केला होता. 1975 मध्ये टेरेसा नॉल्टन नावाची पर्यटक बिकिनी परिधान केलेल्या तलावात मृतावस्थेत आढळली होती. चाल्सने दक्षिण-पुर्व आशियामध्ये 12 पर्यटकांची हत्या केली. आपल्या आकर्षक व्यक्तीमत्वामुळे तो महिलांशी सहज मैत्री करत असे. तो मलींशी मैत्री करायचा आणि त्यांना अंमली पदार्थ द्यायचा आणि खुण करायचा. त्यांच्या वस्तु देखील चोरुन नेत असे. यामुळे मिडिया आणि पोलिसांनी त्याला बीच बिकनी किलर म्हणून ओळख दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com