Charles Sobhraj: बिकनी किलर म्हणून ओळख असलेला चार्ल्स शोभराज कोण आहे!

चार्ल्स शोभराज हा चोरी आणि फसवणूक करण्यात अत्यंत हुशार आहे.
Charles Sobhraj
Charles SobhrajDainik Gomantak
Published on
Updated on

नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने सिरियल किलर चाल्स शोभराज याच्या वयोमानामुळे  सुटकेचा आदेश दिला आहेत. 19 वर्षानंतर त्याची आज सुटका होणार आहे. दोन अमेरिकन पर्यटकांची हत्या केल्याच्या आरोपाखाली चार्ल्स 2013 पासून नेपाळच्या तुरुंगात आहे.

  • 'बिकिनी किलर' आणि 'सिरियल किलर' अशी ओळख

नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या वयोमानामुळे सुटकेचे आदेश दिले आहे. यासोबतच त्याला 15 दिवसांच्या आत मायदेशी पाठवण्यात यावे असेही सांगण्यात आले आहे. चार्ल्सची 'बिकिनी किलर' आणि 'सिरियल किलर' अशी ओळख असलेल्या शोभराजवर भारत, थायलंड, तुर्की आणि इराणमध्ये 20 हून अधिक लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे.

  • कोण आहे चार्ल्स शोभराज?

चार्ल्स शोभराज याचा जन्म व्हिएतनाममध्ये झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याने आग्नेय आशियातील जवळपास सर्वच देशांतील लोकांना विशेषत: मुलींना आपला शिकार बनवला आहे. चार्ल्स शोभराज हा चोरी आणि फसवणूक करण्यात माहीर आहे. त्याला 'बिकिनी किलर' म्हणून ओळखले जात होते.

शोभराजने दक्षिण आणि आग्नेय आशियातील किमान 20 पर्यटकांना ठार मारले आहे. तसेच यामध्ये 14 थायलंडमधील पर्यटकांचा समावेश आहे. 1976 ते 1997 या काळात त्याला भारतातील (India) तुरुंगात ठेवण्यात आले होते. मुलींशी मैत्री केल्यानंतर चार्ल्स त्यांना अंमली पदार्थ द्यायचा आणि त्यांची हत्या करत असे. परदेशी स्त्रिया त्याचा मुख्य बळी असायच्या. तो एवढा धूर्त होता आणि इतक्या चलाखीने गुन्हे करत असे की, त्याचा सुगावा लागण्याआधीच तो गुन्ह्यातून पसार व्हायचा.

Charles Sobhraj
Winter Solstice 2022 Today: ...म्हणून आज असतो सर्वात लहान दिवस
  • 2003 मध्ये करण्यात आली होती अटक

1 सप्टेंबर 2003 रोजी एका वृत्तपत्रात त्याचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर शोभराज नेपाळमधील (Nepal) एका कॅसिनोबाहेर दिसल्याचे समजले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध 1975 मध्ये काठमांडू आणि भक्तपूर येथे दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी दोन स्वतंत्र खुनाचे गुन्हे दाखल केले. तो काठमांडूच्या मध्यवर्ती कारागृहात 21 वर्षे शिक्षा भोगत होता. अमेरिकन नागरिकाच्या हत्येप्रकरणी त्याला 20 वर्षे आणि बनावट पासपोर्ट वापरल्याबद्दल एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

  • चिकन कॅफ्रिअल मुळे अटक

गोव्यात (Goa) फेमस असलेल्या चिकन कॅफ्रिअलची आवड चार्ल्सला होती. 1970 नंतर हिप्पींसाठी हँगआऊट प्रसिद्ध बनलेल्या पर्वरी येथील ओ कोकेरो हॉटेल या कॅफ्रिअलसाठी प्रसिद्ध होते. चार्ल्स तिथे हे वाईन आणि कॅफ्रिअलसाठी अधूनमधून येत असे. याची माहिती मिळताच याच हॉटेलमधून मुंबई पोलिस (Mumbai Police) निरीक्षक प्रभाकर झेंडे यांनी टॅप लावून 6 एप्रिल 1986 रोजी त्याला अटक केली होती.

  • तिहार तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी

1976 मध्ये चार्ल्सने भारत भेटीसाठी आलेल्या एका फ्रेंच ग्रुपची हत्या केली. या प्रकरणात चार्ल्सला इस्रायली पर्यटकाच्या (Tourist) हत्येसाठी सात वर्षांची शिक्षा झाली. यानंतर 1986 मध्ये तो आपल्या साथीदारांसह तिहार तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाला. पण तो पुन्हा पकडला गेल्यावर शिक्षा पूर्ण करून तो फ्रान्सला गेला. त्यानंतर नेपाळ दौऱ्यावर असताना त्याला पुन्हा अटक झाली आणि जन्मठेपेची शिक्षा झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com