कॅनडाची 41 वर्षांनी कबुली! एअर इंडियाच्या 'कनिष्क' विमान अपघातामागे खालिस्तानी दहशतवाद्यांचाच हात; भारताचा मोठा विजय

Canada Csis Admits Air India Bombing: सुमारे चार दशकांनंतर कॅनडाने अखेर ते कटू सत्य स्वीकारले, जे भारत पहिल्या दिवसापासून जगासमोर मांडत होता.
Canada Csis Admits Air India Bombing
Canada Csis Admits Air India BombingDainikGomantak
Published on
Updated on

Canada Csis Admits Air India Bombing: सुमारे चार दशकांनंतर कॅनडाने अखेर ते कटू सत्य स्वीकारले, जे भारत पहिल्या दिवसापासून जगासमोर मांडत होता. कॅनडाची मुख्य गुप्तहेर संघटना 'कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस'ने पहिल्यांदाच अधिकृत आणि जाहीरपणे मान्य केले की, 1985 मधील एअर इंडियाच्या 'इम्परर कनिष्क' या विमानाला बॉम्बने उडवण्यामागे कॅनडातील खालिस्तानी दहशतवादीच होते. कॅनडाची ही कबुली भारतासाठी (India) एक अत्यंत मोठा धोरणात्मक विजय मानला जात आहे, कारण आतापर्यंत ओटावा प्रशासन या भीषण दहशतवादी हल्ल्यासाठी उघडपणे खालिस्तानचे नाव घेणे टाळत होते.

बुधवारी या दुर्दैवी दुर्घटनेच्या स्मृतिदिनानिमित्त एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून 'CSIS'ने थेट फुटीरतावादी चळवळीला या हल्ल्यासाठी जबाबदार धरले. एजन्सीने लिहिले की, 23 जून 1985 रोजी कॅनडातील खालिस्तानी जहालवाद्यांनी प्लांट केलेल्या बॉम्बमुळे हे विमान नष्ट झाले होते आणि विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता; हा कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. 23 जून 1985 रोजी टोरँटोवरुन मुंबईसाठी निघालेले एअर इंडियाचे बोईंग 747 विमान अटलांटिक महासागरावरुन जात असताना झालेल्या बॉम्बस्फोटामुळे कोसळले होते, ज्यात 329 निरपराध लोकांचा बळी गेला होता.

Canada Csis Admits Air India Bombing
India Canada Relations: ‘ते पुन्हा डोकं वर काढतायेत...’ भारतीय वंशाच्या खासदाराने खलिस्तान आणि ट्रूडो सरकारवर साधला निशाणा

अमेरिकेतील 9/11 च्या हल्ल्यापूर्वी हा जगातील सर्वात मोठा विमान वाहतूक क्षेत्रातील दहशतवादी हल्ला होता, जो 'बब्बर खालसा' या प्रतिबंधित खालिस्तानी संघटनेच्या दहशतवाद्यांनी घडवून आणला होता.

Canada Csis Admits Air India Bombing
India Canada Relations: जस्टिन ट्रुडोचे पुन्हा बरळले, आम्ही खलिस्तानसोबत आहोत; भारतासोबतच्या संबंधांवर काय म्हणाले?

कॅनडाला हे सत्य स्वीकारण्यास 41 वर्षे लागण्यामागे अनेक धक्कादायक कारणे आहेत. 2010 मधील एका तपास अहवालानुसार, कॅनडाची गुप्तहेर संस्था आणि पोलीस यांच्यात ताळमेळाचा मोठा अभाव होता. 'CSIS'ने बब्बर खालसाचा म्होरक्या तलविंदर सिंग परमार याचे शेकडो तासांचे वायरटॅप रेकॉर्डिंग्स नष्ट केले होते, जे या प्रकरणातील सर्वात मुख्य पुरावा होते. मृत 329 लोकांपैकी 268 कॅनेडियन नागरिक असूनही, तत्कालीन कॅनेडियन राजकारण्यांनी आणि जनतेने याकडे 'भारताची समस्या' म्हणून दुर्लक्ष केले होते. या प्रदीर्घ खटल्यादरम्यान अनेक मुख्य साक्षीदारांची टार्गेट किलिंग करण्यात आली आणि काहींना धमकावण्यात आले, ज्यामुळे 2005 मध्ये मुख्य आरोपी पुराव्याअभावी सुटले.

Canada Csis Admits Air India Bombing
Canada: खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येवरुन भारतीयांना येतायेत धमक्या; पुन्हा वाढू शकतो भारत-कॅनडा तणाव

पंजाबमध्ये 1970 आणि 80च्या दशकात उफाळलेली खालिस्तान चळवळ भारतात खूप आधीच संपली असली, तरी या चळवळीतील अनेक चेहरे कॅनडा, ब्रिटन आणि अमेरिकेत आश्रय घेऊन भारताच्या विरोधात अजेंडा चालवत आहेत. कॅनडात त्यांना 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य'च्या नावाखाली राजकीय आणि सामाजिक संरक्षण मिळत आले. माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या कार्यकाळात भारत-कॅनडा संबंध कमालीचे ताणले गेले, विशेषतः जेव्हा ट्रूडो यांनी खालिस्तानी कार्यकर्ता हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा आरोप भारतीय गुप्तहेर यंत्रणेवर लावला. मात्र, आता कॅनडाच्या (Canada) स्वतःच्याच गुप्तहेर संस्थेने ही कबुली दिल्यामुळे भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com