Willie Hurt: संपूर्ण आयुष्य आरामात जगता यावे म्हणून भरपूर पैसा असावा असे कोणाला वाटत नाही? कष्ट करुन पैसे मिळवणे खूप अवघड असल्याने अनेकांना असे वाटते की, आपण एकाच झटक्यात श्रीमंत व्हावे.
काही लोकांचे नशीब असे असते की, बंपर लॉटरी जिंकून ते रातोरात करोडपती होतात. अशाच एका व्यक्तीची कहाणी सध्या चर्चेत आहे, ज्याचं नशीब इतकं चांगलं होतं की, त्याने लॉटरीमध्ये करोडो रुपये जिंकले होते.
तो ऐशोआरामात आयुष्य जगत होता, पण नंतर असं काही झालं की तो कंगाल झाला. चला तर मग त्याची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया...
दरम्यान, विली हर्ट (Willie Hurt) असे या व्यक्तीचे नाव आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, विली हा अमेरिकेतील मिशिगनचा रहिवासी आहे. 1989 मध्ये त्याने मिशिगन सुपर लोट्टोच्या तिकिटावर बंपर लॉटरी (Lottery) जिंकली होती. त्याला 2.8 दशलक्ष पौंड मिळाले.
ही रक्कम मोठी असल्याने त्याला लॉटरी लागलेल्या लोकांकडून दोन ऑफर देण्यात आल्या. पहिली म्हणजे तो जिंकलेली संपूर्ण रक्कम एका झटक्यात घेईल आणि दुसरी म्हणजे पुढील 20 वर्षांसाठी त्याचे पैसे हप्त्यांमध्ये घेणार. त्याने जिंकलेली रक्कम हप्त्यांमध्ये घेणे पसंत केले.
रिपोर्ट्सनुसार, ही लॉटरी जिंकल्यानंतर विलीचे आयुष्य पूर्णपणे सेट झाले होते, परंतु तो म्हणतो की, जेव्हा एखाद्याला अचानक खूप पैसे मिळतात तेव्हा तो वेडा होतो, त्याला हे समजत नाही की या पैशाचे काय करावे.
असेच काहीसे विलीच्या बाबतीत घडले. पैशापुढे त्याला सर्व काही तुच्छ वाटू लागले. याच पैशामुळे त्याचे कुटुंब विखुरले. त्याने आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला.
दुसरीकडे, विलीला कोकेनचे व्यसन जडले, हे व्यसन त्याला हळूहळू बरबाद करु लागले. दरम्यान एक घटना घडली. विली एका हॉटेलमध्ये एका महिलेसोबत (Women) होता, जिथे त्याने दारु पिण्यासोबत कोकेनही घेतले होते.
तो पूर्णपणे नशेच्या आहारी गेला होता आणि त्याच दरम्यान त्याने महिलेशी भांडण केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या महिलेचा मृतदेह खोलीत आढळून आला.
आता या हत्येसाठी विलीला जबाबदार धरण्यात आले होते. न्यायालयाने त्याला हत्येप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र, त्यानंतर विलीचे काय झाले हे कोणालाही माहिती नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.