Tharman Shanmugaratnam: भारतीय मूळाचे षण्मुगरत्नम सिंगापुरचे राष्ट्रपती; चिनी वंशाच्या उमेदवारांना केले पराभूत

70 टक्के मते घेत जिंकली निवडणूक; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
Tharman Shanmugaratnam
Tharman Shanmugaratnamgoogle image
Published on
Updated on

Singapore New President Tharman Shanmugaratnam: सिंगापूरच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भारतीय मूळ असलेले थरमन षणमुगरत्नम विजयी झाले आहेत. ते सिंगापुरचे 9 वे राष्ट्रपती असतील. तेथील निवडणूक आयोगाने ही घोषणा केली.

विशेष म्हणजे, थरमन यांनी चिनी वंशाच्या 2 विरोधकांचा दणदणीत पराभव केला आहे. 1 सप्टेंबर रोजी झालेल्या मतदानात त्यांना एकूण 70.4 टक्के मते मिळाली.

शुक्रवारी (1 सप्टेंबर) झालेल्या मतदानात सिंगापूरच्या सुमारे 27 लाख मतदारांपैकी 25.3 लाख लोकांनी मतदान केले. मतदानाची ही टक्केवारी सुमारे 93.4 टक्के इतकी आहे. षण्मुगरत्नम यांचे विरोधक एनजी कोक संग यांना 15.72 टक्के तर टॅन किन लियान यांना 13.88 टक्के मते मिळाली. थर्मन यांना या दोन्ही मतांपेक्षा दुप्पट मते मिळाली.

Tharman Shanmugaratnam
Goa-Oman Flight: गोवा-ओमान विमानसेवा 29 ऑक्टोबरपासून सुरू होणार

कोण आहेत थरमन षण्मुगरत्नम?

थरमन यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1957 रोजी सिंगापूर येथे झाला. त्यांचे आजोबा तामिळनाडूतून स्थलांतरित होऊन सिंगापूरमध्ये स्थायिक झाले होते. थरमन यांचे वडील प्रा. के. षण्मुगररत्नम वैद्यकीय शास्त्रज्ञ होते. त्यांना सिंगापूरमध्ये पॅथॉलॉजीचे जनक मानले जाते.

थरमन हे केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र शिकले आहेत. ते अर्थतज्ज्ञ आहेत. ते सिंगापूरचे 'पॉलिसी मेकर' आहेत. ग्लोबल फोरममध्ये सिंगापूर आणि भारतासारख्या देशांचे म्हणणे बिनधास्त मांडण्यासाठी ते ओळखले जातात.

चीन-अमेरिका या दोन्ही महासत्तांनी आपणच सर्वोत्कृष्ट असल्याचा अहंकार सोडण्याची गरज आहे. विकसनशील देश खूप महत्त्वाचे आहेत हे त्यांना कळायला हवे, असे त्यांनी सुनावले होते.

केंब्रिज विद्यापीठामध्येच भेटली पत्नी

थरमन यांची पत्नी जेन इटोगी ही चिनी-जपानी वंशाची आहे. या दोघांची भेट केंब्रिज विद्यापीठात झाली होती. या दाम्पत्याला एक मुलगी आणि 3 मुलगे आहेत. मुलगी माया वकील आहे. एक मुलगा आकाश सॉफ्टवेअर टेक कंपनी क्रायॉन डेटाचा सह-संस्थापक आहे. कृष्णा हा इकॉनॉमिक्सचा तर अर्जुन सिंगापूर अमेरिकन स्कूलचा विद्यार्थी आहे.

Tharman Shanmugaratnam
Cancer Treatment: आता सात मिनिटांत होणार कॅन्सरवर उपचार, जगातील पहिलाच प्रयोग रुग्णांसाठी ठरणार वरदान

थरमन तिसरे भारतीय वंशाचे अध्यक्ष

थरमन हे सिंगापूरचे तिसरे भारतीय मूळाचे राष्ट्रपती आहेत. 1981 मध्ये संसदेत निवडून आलेले देवेन नायर राष्ट्रपती झाले. एस. आर. नाथन 1999 ते 2011 पर्यंत 11 वर्षे अध्यक्ष होते. दरम्यान, 1991 पासून सर्वसामान्य जनता मतदानाने राष्ट्रपती निवडतात.

पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी षण्मुगरत्नम यांचे अभिनंदन केले. मोदी म्हणाले की, सिंगापूर आणि भारत यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.

सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनीही थरमन यांचे अभिनंदन केले आणि ते अध्यक्षपदाची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला. विजयानंतर माध्यमांशी बोलताना थरमन म्हणाले की, योग्य निर्णय घेतल्याबद्दल सिंगापूरच्या मतदारांचे आभार.

षणमुगररत्नम यांनी सिंगापूरच्या सत्ताधारी पक्ष पीपल्स अॅक्शन पार्टीच्या वतीने निवडणूक लढवली होती. दरम्यान, सिंगापूरमध्ये 11 वर्षांनंतर राष्ट्रपतीपती पदासाठी मतदान झाले. भारताप्रमाणेच सिंगापूरमध्येही राष्ट्रपती पद आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com