Harish Salve: मोदी, अंबानींच्या उपस्थितीत जगातील महागडा वकील तिसऱ्यांदा बोहल्यावर

Harish Salve Marriage: माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे हे जगातील सर्वात महागड्या वकिलांपैकी एक आहेत. मात्र यावेळी ते इतर कोणत्या प्रकरणामुळे नाही तर वयाच्या 68 व्या वर्षी केलेल्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहेत.
Former Solicitor General Harish Salve Married For Third Time At The Age Of 68.
Former Solicitor General Harish Salve Married For Third Time At The Age Of 68.Dainik Gomantak
Published on
Updated on

Former Solicitor General Harish Salve Married For Third Time At The Age Of 68: जगातील सर्वात महागड्या वकिलांपैकी एक असलेले भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे तिसऱ्यांदा बोहल्यावर चढले आहेत.

हरीश साळवे 68 वर्षांचे आहेत आणि त्यांनी तीन वर्षांपूर्वी 2020 मध्ये दुसरे लग्न केले होतो.

आयपीएलचे माजी कमिशनर आणि लंडनला पळून गेलेले ललित मोदी, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी आणि स्टील व्यावसायिक लक्ष्मी मित्तल यांनी हरीश साळवे यांच्या या तिसऱ्या लग्नाला हजेरी लावली होती.

हरीश साळवे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मीनाक्षी होते, ज्यांच्यापासून ते 2020 मध्ये वेगळे झाले. 38 वर्षीय मीनाक्षी यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी कॅरोलिनसोबत दुसरे लग्न केले. कॅरोलिनचेही हे दुसरे लग्न होते.

नॉर्थ लंडनमध्ये राहणाऱ्या हरीश साळवे यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये 56 वर्षीय कॅरोलिन ब्रॉसार्डशी लग्न केले होते. त्यावेळी त्यांच्या लग्नाला फक्त १५ पाहुण्यांनाच आमंत्रित करण्यात आले होते.

हरीश साळवे यांनी 2020 मध्ये कॅरोलिनशी लग्न केले तेव्हा कॅरोलिनला 18 वर्षांची मुलगी होती. कॅरोलिन यूकेमध्ये वाढली आहे. तिने चेल्सी स्कूल ऑफ आर्ट्समधून फाइन आर्ट्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. साळवे यांना मीनाक्षीसोबतच्या पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत, ज्यांची नावे सान्या आणि साक्षी आहेत.

आता तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत हरीश साळवे यांनी तिसरे लग्न केले आहे. त्याच्या तिसऱ्या पत्नीचे नाव त्रिना आहे.

Former Solicitor General Harish Salve Married For Third Time At The Age Of 68.
'पत्नीला सूड उगवायचा आहे,' सुप्रीम कोर्टाने रद्द केला सासरच्यांविरोधातील खटला

हरीश साळवे यांच्याबद्दल सांगायचे झाले तर ते मराठी कुटुंबातून येतात. त्यांच्या वडिलांचे नाव एनकेपी साळवे होते. हरीश साळवे यांचे वडील चार्टर्ड अकाउंटंट होते. हरीश साळवे यांची आई अमृती साळवे या व्यवसायाने डॉक्टर होत्या.

वकील झाल्यानंतर हरीश साळवे यांनी माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबतही काम केले. हरीश साळवे हे वकील म्हणून जगभरात खूप प्रसिद्ध आहेत.

हरीश साळवे यांच्याबद्दल सांगायचे झाले तर ते मराठी कुटुंबातून येतात. त्यांच्या वडिलांचे नाव एनकेपी साळवे होते. हरीश साळवे यांचे वडील चार्टर्ड अकाउंटंट होते. हरीश साळवे यांची आई अमृती साळवे या व्यवसायाने डॉक्टर होत्या.

वकील झाल्यानंतर हरीश साळवे यांनी माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबतही काम केले. हरीश साळवे हे वकील म्हणून जगभरात खूप प्रसिद्ध आहेत.

Former Solicitor General Harish Salve Married For Third Time At The Age Of 68.
अवैध विवाहातून जन्मलेली मुले आमच्यासाठी कायदेशीरच, पालकांच्या संपत्तीत त्यांचाही समान वाटा: सुप्रीम कोर्ट

हरीश साळवे यांनी भारत सरकारच्या वतीने आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या वतीने अनेक खटले लढवले आहेत.

हरीश साळवे यांची राज्यघटनेसह सर्वच कायद्यांवर भक्कम पकड असल्याचे मानले जाते. जेव्हा ते न्यायालयात आपला युक्तिवाद मांडतात तेव्हा न्यायाधीशही त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतात.

कुलभूषण जाधव, रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वाद, सलमान खानचे हिट अँड रन प्रकरण आणि व्होडाफोन टॅक्स वाद हे यातील बरेच गाजलेले खटले त्यांनी लढवले आहेत.

कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली होती. ती केस साळवे यांनी लढवली होती. ज्याच्या बदल्यात त्यांनी भारत सरकारकडून फक्त 1 रुपये फी घेतली होती.

सध्या हरीश साळवे हे कलम 370 च्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात वकीलही आहेत. तसेच नुकतेच मोदी सरकारने वन नेशन, वन इलेक्शनसाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये हरीश साळवे यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com