बल्गेरियाच्या उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मारिया गॅब्रिएल यांनी भारतीय नौदलावर स्तुती सुमनांचा वर्षाव केला. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात अपहरण झालेल्या एका व्यापारी जहाजाची सुटका केली, ज्यामध्ये 7 बल्गेरियन नागरिकांसह 17 जण होते. या बचावासाठी बल्गेरियाने भारताचे आभार मानले. त्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, 'मित्र यासाठीच असतात.'
बल्गेरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रविवारी सोशल मीडिया साइट X वर सांगितले की, ''अपहरण करण्यात आलेले जहाज रुएन आणि 7 बल्गेरियन नागरिकांसह त्याच्या क्रूची सुटका करण्यासाठी यशस्वी ऑपरेशन केल्याबद्दल मी भारतीय नौदलाचे आभार व्यक्त करते. क्रूच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र काम करत राहू.'' बल्गेरियन मंत्र्याने हे ट्विट शेअर करत एस जयशंकर यांनी ट्विट केले की, 'मित्र यासाठीच असतात.'
दुसरीकडे, चाचेगिरी रोखण्यासाठी भारतीय नौदलाने 'ऑपरेशन संकल्प' सुरु केले. या ऑपरेशन अंतर्गत एमव्ही रुएन नावाच्या व्यापारी जहाजाची आणि त्यातील कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. सोकोत्रा या येमेनी बेटाजवळ नुकतेच सोमाली चाच्यांनी या जहाजाचे अपहरण केले होते.
नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, या ऑपरेशनदरम्यान 35 लुटारुंनी आत्मसमर्पण केले. ऑपरेशन संकल्प अंतर्गत, भारतीय नौदलाच्या मार्कोससह भारतीय हवाई दलाच्या सी-17 विमानांनी शनिवारी अरबी समुद्रात चाच्यांविरुद्ध मोठी कारवाई केली.
या ऑपरेशनचे स्वागत करताना, भारतीय हवाई दलाने ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले की, 'एकतेच्या नेत्रदीपक प्रदर्शनात, भारतीय नौदलाच्या दोन कॉम्बॅट रबराइज्ड रेडिंग क्राफ्ट बोटीसह भारतीय वायुसेनेच्या सी-17 विमानांनी समुद्री चाच्यांचा हवाई समाचार घेतला. सध्या सुरु असलेल्या कारवाईचा एक भाग म्हणून समुद्रात मोठी कारवाई करण्यात आली.''
भारतीय नौदलाने लिहिले की, ''भारतीय किनाऱ्यापासून सुमारे 10 तास 2600 किलोमीटर अंतरावर उड्डाण करण्यात आले आणि एमव्ही रुएन या जहाजाच्या चालक दलाला वाचवण्यासाठी ऑपरेशन राबवण्यात आले. सोकोत्रा या येमेनी बेटाजवळ नुकतेच सोमाली चाच्यांनी जहाजाचे अपहरण केले होते. भारतीय नौदलासोबत जवळून काम केल्याने, ऑपरेशन यशस्वी झाले आणि जहाजावरील सर्व 17 क्रूंना सुरक्षितरित्या वाचवण्यात आले.''
भारतीय नौदलाने सांगितले की, 'एमव्ही रुएन हे गेल्या डिसेंबरपासून सोमालियन चाच्यांच्या ताब्यात होते.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.