Pakistan Rain Snowfall: पाकिस्तानमध्ये एकीकडे बर्फवृष्टी आणि पावसाने कहर केला तर दुसरीकडे भूस्खलनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. पाऊस आणि वादळामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सतत पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे 35 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तान हवामानशास्त्र विभागाचे माजी संचालक मुश्ताक अली शाह यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. अशा स्थितीत साधारणत: मार्च महिन्यात हवामान उष्ण असते, मात्र यावेळी प्रचंड थंडी आहे.
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात 48 तास सतत पाऊस पडत असल्याने अनेक जिल्हे जलमय झाले आहेत. वायव्य खैबर पख्तुनख्वा प्रांतात भूस्खलन झाल्यामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले. पाऊस आणि भूस्खलनामुळे 35 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 22 मुलांचा समावेश आहे.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पावसामुळे 150 घरे बुडाली आहेत, तर 500 हून अधिक घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. पाऊस आणि बर्फवृष्टीचा सर्वाधिक परिणाम खैबर पख्तुनख्वा आणि दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतात दिसून आला आहे. या आठवड्यातही बलुचिस्तान आणि काश्मीरच्या काही भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता पाकिस्तानच्या हवामान खात्याने वर्तवली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.