Brazil Flood : ब्राझीलमध्ये पूर, भूस्खलनाचे 48 बळी; 1700 नागरिकांचे स्थलांतर

मदतकार्यात दरोडेखोरांचा अडथळा
Brazil Flood
Brazil FloodDainik Gomantak
Published on
Updated on

Brazil Floods And Landslides: ब्राझीलमध्ये मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनात किमान 48 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर किमान 1700 नागरिकांना विस्थापित व्हावे लागले आहे. येथे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सध्या डझनभर लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

Brazil Flood
India: भारतात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला, सिंगापूरमधून आला सर्वाधिक FDI

साओ सेबॅस्टिओ प्रांताला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. या प्रांताच शेजारील राज्यांशी संपर्क तुटलेला आहे. साओ पाउलोच्या गव्हर्नरनी दिलेल्या माहितीनुसार 38 लोक अद्याप बेपत्ता आहेत, तर 48 लोकांचा मृत्यू झाला आहे.

मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूची प्रकरणे समोर आल्यानंतर रविवारी (19 फेब्रुवारी) येथे सार्वजनिक आपत्ती घोषित करण्यात आली.

शेकडो लोक बेघर

साओ पाउलो राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, ब्राझीलमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे शहरात आतापर्यंत 1800 हून अधिक लोक बेघर झाले आहेत. अजूनही अनेक ठिकाणी रस्ते जाम आहेत.

मोगी-बर्टिओगो आणि रिओ-सँटोस महामार्गांसारखे प्रमुख रस्ते भूस्खलनामुळे बंद झाले आहेत. परिसरातील पाणीपुरवठाही विस्कळीत झाला असून, तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Brazil Flood
Pakistan Economic Crisis: पाकिस्तानच्या आर्थिक संकटात भारत करणार मदत? जयशंकर म्हणाले...

मदतकार्यात अडथळे आणणारे दरोडेखोर

सरकारी आणि खाजगी संस्था मदत आणि बचावकार्यात गुंतल्या आहेत. मात्र, दरड कोसळल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत. विस्थापित लोकांना साओ सेबॅस्टिओच्या शाळा आणि चर्चमध्ये आश्रय देण्यात आला आहे. पीडितांना सुमारे 7.5 टन मदत सामग्रीचे वाटप करण्यात आले आहे.

यामध्ये अन्न-पाण्याव्यतिरिक्त हायजेनिक किटचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, समाजकंटक मदतकार्यात अडथळा आणत आहेत. हल्लेखोर मदत साहित्याने भरलेले ट्रक लुटत आहेत, त्यामुळे पीडितांना मदत करण्यात अडचणी येत आहेत.

राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी सोमवारी आपत्तीग्रस्त भागाला भेट दिली. पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com