Brazil Statue lightning: ब्राझीलच्या ऐतिहासिक येशू पुतळ्यावर पडली वीज, कॅमेरात टिपले अद्भूत क्षण

जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात उंच येशूच्या पुतळ्यावर वीज पडल्याची घटना समोर आली आहे.
Brazil Statue lightning
Brazil Statue lightningDainik Gomantak

Brazil Jesus Statue: ब्राझीलमधून एक अद्भुत फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्री येथील प्रसिद्ध येशूच्या पुतळ्यावर वीज कोसळली आणि तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. 

खरंच हा फोटो अद्भुत आहे. फोटोत तुम्ही पाहू शकता की येशूच्या डोक्याच्या अगदी मध्यभागी वीज पडतांना दिसत आहे. समुद्रसपाटीपासून 700 मीटरपेक्षा जास्त उंचीवर डोंगराच्या शिखरावर येशूची ही मूर्ती आहे.

ब्राझिलियन (Brazil) न्यूज पोर्टल UOL ने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस रिसर्चच्या डेटाच्या आधारे सांगितले आहे की, येशूच्या मूर्तीवर वर्षातून सरासरी 6 वेळा वीज पडते. 2014 मध्ये वीज पडली तेव्हा मूर्तीची दुरुस्ती करावी लागली होती. त्यानंतर दुसऱ्या एका घटनेत मूर्तीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचे टोक विजेच्या धक्क्याने तुटले.

Brazil Statue lightning
Operation Dost Video: तुर्कीस्तानमध्ये भूकंपाच्या वेळी अभिमानाने तिरंगा फडकला, व्हिडिओ पाहून प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान
Brazil Statue lightning
Brazil Statue lightningDainik Gomantak

पुतळ्यावर वीज पडण्याचा तो क्षण खरोखरच अद्भुत होता.  ब्राझीलमधील एन्कांटॅडो येथे येशूची ही जगातील तिसरा सर्वात उंच पुतळा आहे. त्याचे बांधकाम एप्रिल 2022 मध्ये पूर्ण झाले. त्याची उंची सुमारे 141 फूट एवढी आहे.

या पुतळ्याचे आणखी एक खास गोष्ट आहे. यामध्ये हृदयाच्या आकाराची बाल्कनी देखील आहे. जी जमिनीपासून 40 मीटर उंचीवर येशूच्या छातीवर आहे. पर्यटक लिफ्टच्या साहाय्याने या बाल्कनीत पोहचु शकतात. तेथून त्यांना देशाचे अद्भुत दृश्य पाहण्याचा अनुभव घेता येतो.  या पुतळ्याला 'ख्रिस्ट द प्रोटेक्टर' असे नाव देण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com