Israel Iran Tension: इस्रायल-इराण युद्धाच्या उंबरठ्यावर! इस्त्रायचा सीरियाच्या दोन एअरपोर्टवर हल्ला

इस्रायलने सीरियातील दमास्कस आणि अलेप्पो विमानतळांवर हवाई हल्ले केले आहेत.
Israel Iran Tension
Israel Iran TensionDainik Gomantak

इस्रायल (Israel) आणि इराणमध्ये (Iran) युद्धाची स्थिती दिसून येत आहे. खर तर इस्रायलने इराणी विमानांना लक्ष्य करत सीरियातील दोन विमानतळांवर हवाई हल्ले केले आहेत. इराणचे विमान क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असल्याचे बोलले जात आहे.

इस्रायलने बुधवारी रात्री सीरियातील अलेप्पो आणि दमास्कस विमानतळांवर हवाई हल्ले केले आहे. सीरियन मीडियानुसार इस्रायलने तासाभरात दोन विमानतळांवर हवाई हल्ले केले आहेत. इराणचे विमान उतरू नये म्हणून इस्रायलने अलेप्पो विमानतळाला (AirPort) लक्ष्य केल्याचा दावा इराणी मीडियाने केला आहे.

Israel Iran Tension
Pakistan त 8 वर्षीय हिंदू मुलीवर सामूहिक बलात्कार, नरधमांनी काढले डोळे

बायडनशी बोलल्यानंतर एअरस्ट्राइक

सीरियन मीडियानुसार, इस्रायलच्या हल्ल्यात विमानतळाचे मोठे नुकसान झाले आहे. हल्ल्यादरम्यान विमानतळावर हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय होती. तसेच क्षेपणास्त्र रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. सीरियात हवाई हल्ला करण्यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान यैर लॅपिड यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचेही वृत्तात म्हटले जात आहे.

सीरियन अरब न्यूज एजन्सीनुसार, दमिश्कच्या ग्रामीण भागात इस्त्रायली हल्ल्याचा सामना करताना सीरियन हवाई संरक्षणाने अनेक क्षेपणास्त्रे टाकली आहे. सीरियन लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, स्थानिक वेळेनुसार रात्री 9.15 वाजता इस्रायलने उत्तर व्याप्त पॅलेस्टाईनमधील लेक टिबेरियासच्या दिशेने हल्ला केला आणि दमिश्कच्या आग्नेयेकडील काही ठिकाणांना लक्ष्य केले.

इस्रायलच्या लष्करी सूत्रांनी सांगितले की, रात्री आठच्या सुमारास इस्रायलने अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला. इस्रायलच्या हल्ल्यात विमानतळाचे नुकसान झाले असले तरी कोणीही जखमी झाले नसल्याचे सीरियन माध्यमांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com