Suicide Attack In Pakistan: पाकिस्तानी सैन्याच्या चेकपोस्टला पुन्हा बनवले निशाणा! आत्मघाती हल्ल्यात 20 सैनिक मारल्याचा दावा, धडकी भरणारा VIDEO व्हायरल

Suicide Attack Kills Pakistani Troops: उत्तर वझिरीस्तानमधील मिर अली भागात असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या हादी फोर्ट चेकपोस्टवर शुक्रवारी मोठा आत्मघाती हल्ला झाला.
Suicide Attack In Pakistan
Suicide AttackDainik Gomantak
Published on
Updated on

Suicide attack In Pakistan: अफगाणिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला. उत्तर वझिरीस्तानमधील मिर अली भागात असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या हादी फोर्ट चेकपोस्टवर शुक्रवारी (17 ऑक्टोबर) सकाळी मोठा आत्मघाती हल्ला झाला. स्फोटकांनी भरलेली एक गाडी चेकपोस्टच्या मुख्य दरवाजावर धडकवण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसर धुराने भरुन गेला. या भीषण हल्ल्यात 20 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा केला जात आहे. तर 13 सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दोहा येथे पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तान यांच्यात शांतता चर्चा सुरु होण्याच्या काही तास आधीच हा हल्ला झाल्यामुळे सीमावर्ती भागातील तणाव अधिकच वाढला.

Suicide Attack In Pakistan
Afghanistan Pakistan Clash: तालिबानच्या हल्ल्याने पाकिस्तानची नाचक्की! सैनिकांच्या पॅन्ट आणि शस्त्रे जप्त; 48 तासांची युद्धबंदी जाहीर Watch Video

स्फोटकांनी भरलेली गाडी चेकपोस्टवर धडकवली

ट्रटी वर्ल्ड आणि अन्य एजन्सींच्या माहितीनुसार, आज उत्तर वझिरीस्तानमध्ये आणखी एक हल्ला झाला. अतिरेक्यांनी सुरक्षा मुख्यालयावर हल्ला केला. पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नक्वी यांनी अनादोलू एजन्सीला बोलताना सांगितले की, "आम्ही हा हल्ला यशस्वी होऊ दिला नाही. हल्ल्यात सामील असलेल्या चारही अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे."

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हादी फोर्ट चेकपोस्टवर पहिल्यांदा स्फोटकांनी भरलेली गाडी दरवाजावर धडकवण्यात आली. त्यानंतर जोरदार गोळीबार सुरु झाला. मात्र, पाकिस्तानी सैन्याने हल्लेखोरांना चौकीच्या आत प्रवेश करु दिला नाही. सध्या लष्कराचे ऑपरेशन सुरु असून चार अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

Suicide Attack In Pakistan
Taliban Pakistan War: तालिबान आणि पाकिस्तानी सैन्यात चकमक, पाकचे 12 सैनिक ठार, अनेक चौक्या ताब्यात

व्हिडिओमध्ये दिसले भयावह दृश्य

दुसरीकडे, या आत्मघाती हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये हल्ला झाल्यानंतरचे भयावह दृश्य दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये मोठा स्फोट होऊन काळा धूर सर्वत्र पसरल्याचे दिसत आहे, तर परिसरात गोळीबाराचे आवाज घुमत आहेत.

@kamleshdabhhi नावाच्या एका युजरने 'एक्स' वर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात धुराच्या मधून गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत. या पोस्टमध्ये 20 सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, अधिकृत आकडेवारीनुसार मृतांचा आकडा 7 इतकाच आहे. दोहा येथे शांतता चर्चा सुरु असताना झालेल्या या आत्मघाती हल्ल्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील (Afghanistan) सीमेवरील परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com