

Pakistan Supreme Court Blast: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) इमारतीत मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या स्फोटात न्यायालयातील कर्मचारी आणि दुरुस्तीचे काम करणारे कामगार मिळून 12 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. अचानक झालेल्या या स्फोटामुळे संपूर्ण इमारतीत मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) इमारतीच्या बेसमेंटमध्ये असलेल्या कॅन्टीनमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले. मात्र, नंतरच्या वृत्तांमध्ये स्फोटाचे कारण वेगळे असल्याचे समोर आले. पाकिस्तानमधील (Pakistan) 'समा टीव्ही' (Samaa TV) या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट इमारतीच्या सेंट्रल एअर कंडिशनिंग (AC) सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना झाला. दुरुस्तीच्या कामात काही तांत्रिक बिघाड झाल्याने हा शक्तिशाली स्फोट झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हा स्फोट इतका जोरदार होता की, त्याचे झटके संपूर्ण सर्वोच्च न्यायालयाच्या भवनभर जाणवले. स्फोटामुळे संपूर्ण इमारत हादरल्याने वकील, न्यायाधीशांचे कर्मचारी आणि इतर कर्मचारी घाबरुन बिल्डिंगमधून तात्काळ बाहेर पळू लागले. त्यामुळे तिथे काही काळ गोंधळाचे (Chaos) वातावरण निर्माण झाले. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामुळे कोर्ट क्रमांक 6 चे मोठे नुकसान झाले आहे. स्फोट होण्यापूर्वी न्यायमूर्ती अली बाकर नजफी आणि न्यायमूर्ती शाहजाद मलिक हे या कोर्टात सुनावणी (Hearing) घेत होते.
स्थानिक वृत्तानुसार, जखमी झालेल्यांमध्ये बहुतांश लोक एसी प्लांटजवळ दुरुस्तीचे काम करत होते. स्फोट होताच त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या स्फोटाच्या नेमक्या कारणांची कसून चौकशी केली जात आहे. बेसमेंटमधील हे कॅफेटेरिया केवळ सुप्रीम कोर्टाच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव असल्याचेही सांगण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.