Bill Gates AI Warning: 'एआय'मुळे जाऊ शकतो एक अब्ज लोकांचा जीव! बिल गेट्स यांच्या भूमिकेने टेक जगतात खळबळ; नियम बनवण्याची सरकारकडे मागणी

Bill Gates AI Warning 2026: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या झपाट्याने वाढणाऱ्या वापराबाबत मोठी चिंता व्यक्त केली.
Artificial Intelligence Government Regulation
Bill Gates AI WarningDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Artificial Intelligence Government Regulation: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या झपाट्याने वाढणाऱ्या वापराबाबत मोठी चिंता व्यक्त केली असून, त्यावर सरकारचे कडक नियंत्रण आणि नियमन असण्याची मागणी केली. ‘एनबीसी न्यूज’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, एआयचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर मानवी हानी घडवून आणू शकतो. त्यामुळे केवळ तंत्रज्ञान कंपन्यांवर सर्व जबाबदारी सोडून चालणार नाही, तर अमेरिकन सरकारने सुरक्षेसाठी कठोर कायदे आणि नियम लागू करणे अत्यंत गरजेचे आहे.

गेट्स यांच्या मते, वॉश्टिंगटनमधील धोरणकर्त्यांनी एआय सिस्टीम्सच्या विकासावर, चाचणीवर आणि त्याच्या देखरेखीवर थेट नियंत्रण ठेवले पाहिजे. शक्तिशाली एआय मॉडेल्स तयार करणाऱ्या कंपन्यांसाठी सुरक्षिततेचे उपाय आणि मॉनिटरिंग सिस्टीम बंधनकारक असावी. यामुळे कंपन्यांची जबाबदारी वाढेल, परंतु यामुळे कोणत्याही प्रकारचा तांत्रिक विकास थांबणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. एआयमुळे केवळ चुकीची माहिती पसरणे किंवा नोकऱ्या जाणे इतकेच धोके मर्यादित नसून, वाईट हेतू असलेले लोक किंवा संघटना या यंत्रणेचा वापर करुन मोठ्या प्रमाणावर विनाश घडवून आणू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

Artificial Intelligence Government Regulation
America Tariff: ट्रम्प यांची स्वाक्षरी अन् जागतिक व्यापारात खळबळ! रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 100 टक्के टॅरिफचा चाबूक; भारतासह चीनला मोठा फटका

या संदर्भात बोलताना त्यांनी अत्यंत वाईट परिस्थितीचा संदर्भ देत 'एक अब्ज लोकांच्या मृत्यू'ची शक्यता वर्तवली. मात्र, ही कोणतीही निश्चित भविष्यवाणी नसून, भविष्यातील संभाव्य धोक्यांची तीव्रता समजून सांगण्यासाठी त्यांनी हे उदाहरण दिले. सध्या टेक जगतात एआयच्या नियमनावरुन मोठी चर्चा सुरु आहे. एन्थ्रोपिकचे सीईओ डारियो अमोदेई यांनी नियमांचे समर्थन केले, तर ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी आंतरराष्ट्रीय मानके आणि मानवी देखरेखीवर भर दिला. दरम्यान, मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या मते कंपन्यांनी स्वतःच अंतर्गत यंत्रणेद्वारे सुरक्षेची काळजी घ्यावी.

Artificial Intelligence Government Regulation
Iran America Conflict: 5 तेल टँकर्स खाक झाल्यानंतर इराणचा मोठा गेम! अमेरिकेच्या 21 कोटींच्या 'ड्रोन पाणबुडी'वर केला कब्जा; व्हिडिओ शेअर VIDEO

फेडरल स्तरावर अद्याप चर्चा सुरु असतानाच, अमेरिकेतील (America) काही राज्यांनी स्वतःहून पावले उचलण्यास सुरुवात केली. कॅलिफोर्नियाने सुरक्षितता धोरणांसाठी एक तज्ज्ञ समिती नेमली असून मेरीलँड आणि न्यूयॉर्कनेही एआय नियमनासाठी पावले उचलली आहेत. दुसरीकडे, मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रॅड स्मिथ यांनी चेतावणी दिली की, एआय कंपन्यांमधील स्पर्धेत सुरक्षेशी तडजोड केली जाऊ नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com