Imran Khan Bail: अखेर इम्रान खान यांना जामिन मंजूर; 17 मे पर्यंत अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश

इम्रान म्हणाले, हा माझा देश, माझी सेना, माझे लोक...
Imran Khan Bail
Imran Khan BailDainik Gomantak

Imran Khan Bail: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिके इन्साफ (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांना शुक्रवारी (12 मे) इस्लामाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात हायकोर्टाने त्यांना दोन आठवड्यांचा जामीन मंजूर केला. तसेच खान यांना 17 मे पर्यंत कोणत्याही परिस्थितीत अटक करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Imran Khan Bail
Blast In Italy: इटलीच्या मिलानमध्ये भीषण स्फोट, अनेक वाहने जळून खाक!

कोर्ट रूम नंबर 3 मध्ये ही सुनावणी सुरू असताना पीटीआय समर्थकांनी जोरदार गोंधळ घातला. सुनावणीसाठी तीन न्यायाधीशांचे खंडपीठ उपस्थित होते. सुनावणीपूर्वी इम्रान खान यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत इस्लामाबाद न्यायालयात नेण्यात आले.

इम्रान खान यांच्या समर्थकांनी इस्लामाबादचा श्रीनगर महामार्ग बंद केला होता. इस्लामाबाद उच्च न्यायालयात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

इम्रान खान म्हणाले की, काहीही झाले तरी देश सोडणार नाही. हा माझा देश आहे, ही माझी सेना आहे, ही माझी जनता आहे.

यापूर्वी इम्रान खान यांना मंगळवारी (9 मे) इस्लामाबाद उच्च न्यायालयातून पाक रेंजर्सच्या पथकाने अटक केली होती. अटकेनंतर निदर्शने सुरू झाली होती, त्यानंतर पीटीआय कार्यकर्त्यांनी देशाच्या विविध भागात जाळपोळ केली होती. गुरुवारी, 11 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने इम्रान यांची अटक बेकायदेशीर ठरवत त्याची सुटका करण्याचे आदेश दिले.

Imran Khan Bail
Imran Khan: इम्रान यांच्या जामिनावर सुनावणीवेळी न्यायाधीशच उठून गेले बाहेर; खान यांनी दिली धमकी...

इम्रान खान यांच्या सुटकेच्या आदेशावर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तानच्या माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सांगितले की, आज पाकिस्तान जळत आहे, त्याचप्रमाणे उद्या तुमचे घरही जळणार आहे.

याशिवाय पीएमएल-एनच्या नेत्या मरियम नवाझ शरीफ यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर म्हटले होते की, तुम्ही एका गुन्हेगाराच्या सुटकेचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळाची बैठक शुक्रवारी झाली. इम्रान खान यांच्यावर आधीच शेकडो खटले सुरू आहेत, त्यामुळे सरकारला त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात त्यांना अटक करायची आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com