4 षटक, 8 विकेट्स... बुमराह-शमीला जमलं नाही, ते 22 वर्षीय तरुणाने करून दाखवलं! विश्वविक्रम रचला Watch Video

Best Bowling in T20 Cricket: आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये ७ बळी घेण्याचे विक्रम आपण ऐकले होते, पण भूतानच्या एका २२ वर्षीय तरुणाने असा पराक्रम केला आहे.
Sonam Yeshey Best Bowling in T20 Cricket
Sonam Yeshey Best Bowling in T20 CricketDainik Gomantak
Published on
Updated on

क्रिकेटच्या मैदानात कधी कोणता चमत्कार होईल हे सांगता येत नाही. आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये ७ बळी घेण्याचे विक्रम आपण ऐकले होते, पण भूतानच्या एका २२ वर्षीय तरुणाने असा पराक्रम केला आहे, जो आजवर जगातील कोणत्याही दिग्गज गोलंदाजाला जमलेला नाही. भूतानचा डावखुरा फिरकीपटू सोनम येशे याने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात ८ गडी बाद करून इतिहास रचला आहे. म्यानमारविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात प्रतिस्पर्धी फलंदाजांना असे काही अडकवले की, संपूर्ण क्रिकेट जगत थक्क झाले आहे.

केवळ ७ धावा आणि ८ फलंदाज तंबूत

गेलेफू येथे भूतान आणि म्यानमार यांच्यात सुरू असलेल्या टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात हा ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. भूतानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १२७ धावांचे माफक आव्हान म्यानमारसमोर ठेवले होते.

हे आव्हान गाठताना म्यानमारचा संघ सहज जिंकेल असे वाटत होते, मात्र सोनम येशेच्या मनात काहीतरी वेगळेच होते. सोनमने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ ७ धावा खर्च केल्या आणि म्यानमारच्या ८ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याच्या या भेदक गोलंदाजीमुळे म्यानमारचा संपूर्ण संघ अवघ्या ४५ धावांवर गारद झाला.

Sonam Yeshey Best Bowling in T20 Cricket
Goa Education: 11 वीच्‍या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! उच्च माध्‍यमिक विद्यालये बनवणार प्रश्नपत्रिका; प्रश्‍‍नांची बँक येणार वापरात

या कामगिरीसह सोनम येशे कोणत्याही स्तरावरील टी२० क्रिकेटमध्ये ८ बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. याआधी पुरुष टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम मलेशियाच्या सिजरूल इदरूसच्या नावावर होता, ज्याने २०२३ मध्ये चीनविरुद्ध ८ धावा देऊन ७ बळी घेतले होते.

आता सोनमने ७ धावांत ८ बळी घेत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे, आजवर आंतरराष्ट्रीय आणि देशार्गत टी२० क्रिकेटमध्ये केवळ चार वेळा ७ बळी घेण्याची नोंद झाली होती, पण ८ बळींचा टप्पा गाठणारा सोनम हा एकमेव ठरला आहे.

Sonam Yeshey Best Bowling in T20 Cricket
Droupadi Murmu Goa Visit: राष्ट्रपतींनी मुर्मूंनी केला ‘वाघशीर’मधून प्रवास! ‘INS हंसा’ तळावर भव्य स्वागत; स्पेक्ट्रमची केली पाहणी

सोनम येशेची कारकीर्द

केवळ १८ व्या वर्षी २०२२ मध्ये मलेशियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या सोनमने आपल्या पहिल्याच सामन्यात ३ बळी मिळवून आपली चमक दाखवली होती. आतापर्यंत त्याने ३४ टी२० सामन्यांत ३७ बळी घेतले आहेत.

सध्या सुरू असलेल्या मालिकेतही त्याचा दबदबा कायम असून त्याने ४ सामन्यांत १२ बळी टिपले आहेत. मालिकेतील शेवटचा सामना आज, २९ डिसेंबर रोजी खेळवला जाणार असून चाहत्यांचे लक्ष पुन्हा एकदा या विक्रमी गोलंदाजाकडे लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com