Goa Education: 11 वीच्‍या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! उच्च माध्‍यमिक विद्यालये बनवणार प्रश्नपत्रिका; प्रश्‍‍नांची बँक येणार वापरात

Goa Class 11 Students Exam Paper: नववीप्रमाणेच इयत्ता अकरावीच्‍या प्रश्‍‍नपत्रिकाही उच्च माध्‍यमिक विद्यालयांना तयार करण्‍याची मुभा गोवा शालान्‍त मंडळाने दिली आहे.
Goa Education
Goa EducationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नववीप्रमाणेच इयत्ता अकरावीच्‍या प्रश्‍‍नपत्रिकाही उच्च माध्‍यमिक विद्यालयांना तयार करण्‍याची मुभा गोवा शालान्‍त मंडळाने दिली आहे. मंडळाच्‍या या निर्णयामुळे नव्‍या शैक्षणिक धोरणाअंतर्गत (एनईपी) प्रश्‍‍नांची बँक तयार करण्‍यास मदत होणार असून, शिक्षकांनाही कला दाखवण्‍याची संधी मिळणार असल्‍याचे मंडळाचे अध्‍यक्ष भगीरथ शेट्ये यांनी रविवारी ‘गोमन्‍तक’ला सांगितले.

शालान्‍त मंडळाने राज्‍यभरातील शाळांमधील मुख्‍याध्‍यापक आणि शिक्षकांशी चर्चा करून प्रथमच इयत्ता नववीच्‍या प्रश्‍‍नपत्रिका विद्यालयांच्‍या शिक्षकांना तयार करण्‍याची मुभा दिली. मंडळाच्‍या या निर्णयामुळे अनेकांकडून आश्‍‍चर्य व्‍यक्त करण्‍यात येत असले, तरी या निर्णयाचा भविष्‍यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्‍याचे शेट्ये यांनी सांगितले. याआधी नववी आणि अकरावीच्‍या प्रश्‍‍नपत्रिका मंडळाकडून तयार करण्‍यात येत होत्‍या.

चार-पाच शिक्षक मिळून राज्‍यभरातील विद्यार्थ्यांना कोणते प्रश्‍‍न विचारायचे, हे ठरवत होते. त्‍यामुळे विद्यार्थ्यांच्‍या मनातही भीती निर्माण होत होती. आता त्‍यांचे शिक्षकच त्‍यांच्‍या प्रश्‍‍नपत्रिका तयार करणार असल्‍याने विद्यार्थ्यांच्‍या मनातून प्रश्‍‍नपत्रिकेबाबतची भीती नष्‍ट होणार असल्‍याचे ते म्‍हणाले.

‘एनईपी’अंतर्गत प्रश्‍‍नांची बँक तयार करण्‍याचे निर्देश केंद्र सरकारने राज्‍यांना दिले आहेत. नववी आणि अकरावीच्‍या प्रश्‍‍नपत्रिका तयार करण्‍याची जबाबदारी मंडळाने विद्यालये आणि उच्च माध्‍यमिक विद्यालयांना दिल्‍याने प्रत्‍येक विद्यालय, उच्च माध्‍यमिक विद्यालयांतील शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्‍‍नपत्रिका तयार करतील. त्‍याचा फायदा प्रश्‍‍नांची बँक तयार करण्‍यास मिळेल. या प्रक्रियेत शिक्षक ज्‍या पद्धतीने प्रश्‍‍नपत्रिका तयार करतील, त्‍यातून त्‍यांची शिक्षण देण्‍याची कलाही समोर येईल, असेही शेट्ये यांनी नमूद केले.

Goa Education
Goa Education: विद्यार्थ्यांचा ताण होणार कमी! गोव्यात नववीचे पेपर आता शाळाच काढणार; बोर्डाचा जुना निर्णय मागे

‘ब्‍ल्‍यू प्रिंट’नुसारच हव्‍यात प्रश्‍‍नपत्रिका

नववी आणि अकरावीच्‍या प्रश्‍‍नपत्रिका शिक्षकांना मंडळाच्‍या ‘ब्‍ल्‍यू प्रिंट’नुसारच तयार कराव्‍या लागतात. त्‍यात प्रश्‍‍नांचे स्‍वरूप कसे असावे, कोणत्‍या पद्धतीचे प्रश्‍‍न विद्यार्थ्यांना विचारावे, याची संपूर्ण माहिती देण्‍यात आली आहे. याची पूर्ण जबाबदारी प्रश्‍‍नपत्रिका तयार करणाऱ्या शिक्षकांवर राहणार असल्‍याचेही शेट्ये यांनी नमूद केले.

Goa Education
Goa Education: पाच वर्षांत 891 मुलांनी सोडल्या शाळा! 374 किशोरवयीन मुलींचा समावेश; राज्यसभेत मंत्र्यांची माहिती

प्रश्‍‍नपत्रिकांचे होणार अवलोकन

नववी व अकरावीच्‍या परीक्षा संपल्‍यानंतर विद्यालये, उच्च माध्‍यमिक विद्यालयांनी केलेल्‍या प्रश्‍‍नपत्रिका आणि विद्यार्थ्यांनी सोडवलेल्‍या उत्तरपत्रिका मागवून घेऊन अवलोकन केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com