Houthi Rebels In Red Sea
Houthi Rebels In Red SeaDainik Gomantak

Houthi Rebels In Red Sea: लाल समुद्रात झुंज! अमेरिकेकडून 10 हुथी बंडखोरांचा खात्मा, पाहा थरारक Video

Red Sea: यावर अमेरिकेने आपल्या युद्धनौकांसह लष्करी हेलिकॉप्टर घटनास्थळी पाठवले आणि हुथी बंडखोरांनी अमेरिकन हेलिकॉप्टरवर गोळीबार केला. या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून हुथी बंडखोरांनाही अमेरिकन हेलिकॉप्टरने लक्ष्य केले.
Published on

Battle in the Red Sea! US kills 10 Houthi rebels:

इस्रायल-हमास युद्धानंतर, लाल समुद्र आणि अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांवर सातत्याने हल्ले होत आहेत. आता ताज्या प्रकरणात, अमेरिकन सैन्याने दावा केला आहे की त्यांच्या सैन्याच्या कारवाईत अनेक हुथी बंडखोर मारले गेले आहेत.

अमेरिकेच्या या कारवाईनंतर लाल समुद्र परिसरात तणाव वाढण्याची भीती आहे. अमेरिकेने सांगितले की त्यांच्या सुरक्षा दलांनी स्वसंरक्षणार्थ कारवाई केली, ज्यामध्ये सुमारे 10 हुथी बंडखोर मारले गेले आणि त्यांच्या तीन बोटीही बुडाल्या.

यूएस आर्मीच्या सेंट्रल कमांडने एक निवेदन जारी केले की, शनिवारी सिंगापूरचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर हुथी बंडखोरांनी हल्ला केला.

हल्ल्याची माहिती मिळताच अमेरिकेने तात्काळ आपल्या युद्धनौका घटनास्थळी पाठवून हौथी बंडखोरांची दोन जहाजविरोधी क्षेपणास्त्रे नष्ट केली.

यानंतर सिंगापूरचे हे जहाज जेव्हा दक्षिण लाल समुद्रात पोहोचले तेव्हा रविवारी सकाळी हुथी बंडखोरांनी पुन्हा जहाजावर हल्ला केला. रविवारच्या हल्ल्यात हुथी बंडखोरांनी अनेक बोटीतून जहाज ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

Houthi Rebels In Red Sea
Houthi Rebels: लाल समुद्रात जहाजावर पुन्हा हल्ला, अमेरिकेने नष्ट केली हुथी बंडखोरांची जहाजविरोधी क्षेपणास्त्रे

यावर अमेरिकेने आपल्या युद्धनौकांसह लष्करी हेलिकॉप्टर घटनास्थळी पाठवले आणि हुथी बंडखोरांनी अमेरिकन हेलिकॉप्टरवर गोळीबार केला. या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून हुथी बंडखोरांनाही अमेरिकन हेलिकॉप्टरने लक्ष्य केले.

अमेरिकेच्या या कारवाईत अनेक हुथी बंडखोर मारले गेले आणि त्यांच्या तीन बोटीही बुडाल्या. एक बोट घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाली.

या कारवाईत अमेरिकन लष्कराचे कोणतेही नुकसान झाले नाही. हुथी बंडखोरांनी त्यांच्या 10 लोकांच्या मृत्यूची कबुली दिली आहे आणि परिणामांना सामोरे जाण्याची धमकीही दिली आहे. या घटनेनंतर लाल समुद्र परिसरात तणाव वाढण्याची शक्यता आहे.

Houthi Rebels In Red Sea
'अंतराळात फिल्म स्टुडिओ', 'फ्रान्समध्ये 100 वर्षांनंतर ऑलिम्पिक...' 2024 मध्ये जगात घडणार 'या' गोष्टी

19 नोव्हेंबरपासून लाल समुद्र आणि अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गावरील व्यावसायिक जहाजांवर 23 हल्ले झाले आहेत.

इस्रायल-हमास युद्धामुळे हे हल्ले होत आहेत. खरेतर, इराण समर्थित हुथी बंडखोर पॅलेस्टिनी लोकांच्या समर्थनार्थ आणि गाझामधील इस्रायली कारवाईच्या विरोधात हे हल्ले करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com