Houthi Rebels: लाल समुद्रात जहाजावर पुन्हा हल्ला, अमेरिकेने नष्ट केली हुथी बंडखोरांची जहाजविरोधी क्षेपणास्त्रे

Red Sea: अमेरिकन सैन्याने सांगितले की, त्यांच्या युद्धनौका यूएसएस ग्रेव्हली आणि यूएसएस लॅबून यांना सिंगापूरचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजाकडून मदतीसाठी कॉल आला होता.
Houthi Rebels|Red Sea|Anti Ship Missiles
Houthi Rebels|Red Sea|Anti Ship MissilesDainik Gomantak
Published on
Updated on

US destroys Houthi rebels' anti-ship missiles in Red Sea ship attack:

हुथी बंडखोरांनी डागलेल्या दोन जहाजविरोधी क्षेपणास्त्रांना (Anti Ship Missiles) अमेरिकेने लक्ष्य करून नष्ट केले आहे.

येमेनमधील हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील एका कंटेनर जहाजाला लक्ष्य करत ही क्षेपणास्त्रे डागली.

अलीकडेच अमेरिकेने लाल समुद्रात हुथी बंडखोरांनी केलेला जहाजविरोधी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला हाणून पाडला होता. तीन दिवसांतील हा दुसरा हल्ला होता, जो अमेरिकेने हाणून पाडला.

दीड महिन्यात 23 वा हल्ला

अमेरिकन सैन्याच्या यूएस सेंट्रल कमांडने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, येमेनमधून इराण समर्थित हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे डागली आहेत.

यूएस सेंट्रल कमांडने म्हटले आहे की, 19 नोव्हेंबरपासून हाऊथी बंडखोरांनी आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांवर केलेला हा 23 वा हल्ला आहे.

युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायल-हमास हुथी बंडखोर लाल समुद्र आणि अरबी समुद्रात व्यापारी जहाजांवर हल्ले करत आहेत. गाझाच्या समर्थनार्थ हुथी बंडखोर हे हल्ले करत आहेत. विशेषत: इस्रायलची जहाजे हौथी बंडखोरांचे लक्ष्य आहेत.

Houthi Rebels|Red Sea|Anti Ship Missiles
Pakistan: मानवाधिकारांची एैशी तैशी!पाकिस्तानात अपहरण झालेल्या नागरिकांची संख्या तीन हजारांच्या पुढे

अमेरिकन सैन्याने सांगितले की, त्यांच्या युद्धनौका यूएसएस ग्रेव्हली आणि यूएसएस लॅबून यांना सिंगापूरचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजाकडून मदतीसाठी कॉल आला होता.

या आवाहनाला प्रतिसाद देत दोन्ही युद्धनौकांनी लाल समुद्रात पोहोचून व्यापारी जहाजावरील हल्ला हाणून पाडला आणि लाल समुद्रातून सुखरूप बाहेर काढले. ज्या जहाजावर हल्ला झाला ते डेन्मार्कचे होते.

Houthi Rebels|Red Sea|Anti Ship Missiles
Israel-Hamas War: ''गाझामध्ये राहणारा प्रत्येकजण दहशतवादी, मी नरकातून सुटले...'', हमासच्या तावडीतून सुटलेल्या मियाचा खुलासा

जगभरातील एकूण व्यापारापैकी १२ टक्के व्यापार हा आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गावर होतो. त्यामुळेच अमेरिकेसह अनेक देशांचे नौदल या मार्गाला सुरक्षा पुरवत असून त्यात भारतीय नौदलाचाही समावेश आहे.

व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी भारतीय नौदलाने आपल्या पाच युद्धनौका अरबी समुद्र आणि लाल समुद्र परिसरात तैनात केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com