Bangladesh Crisis: भारताच्या शेजारील देशांचे ग्रह फिरले आहेत. पहिल्यांदा श्रीलंका दिवाळखोर झाला, त्यानंतर 2023 मध्ये पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत, तर आता भारताचा पूर्वेकडील शेजारी बांगलादेश देखील गंभीर संकटाचा सामना करत आहे.
वास्तविक, आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी मूडीजने बांगलादेशच्या बँकांचे रेटिंग कमी केले आहे, त्यामुळे तेथील बँकिंग क्षेत्रात भूकंप झाला आहे. मूडीजने बांगलादेशच्या (Bangladesh) बँकिंग क्षेत्राचे पतमानांकन स्थिर वरुन नकारात्मक केले आहे. त्यामुळे तेथील बँकांना गुंतवणूक मिळण्यात अडचणी येणार आहेत.
अर्थतज्ज्ञांच्या मते, मूडीजचा हा निर्णय बँकिंग क्षेत्रासाठी जितकी वाईट बातमी आहे तितकीच ती अर्थव्यवस्थेसाठीही वाईट आहे. बांगलादेशी चलनाचे मूल्य सातत्याने कमी होत आहे, तर महागाई (Inflation) शिगेला पोहोचली आहे. याशिवाय देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात सातत्याने घट होत आहे.
दुसरीकडे, मूडीजच्या ताज्या मूल्यांकनानंतर सीमापार आर्थिक व्यवहार अधिक कठीण होतील याकडे अर्थतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. काही परदेशी संस्थांनी तर बांगलादेशी बँकांची कर्ज मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवाय, बांगलादेशकडे आता 32 अब्ज डॉलरपेक्षा कमी परकीय चलन साठा आहे. ऑगस्ट 2021 मध्ये परकीय चलन साठा $48 अब्ज होता. दरम्यान, बांगलादेशचे चलन टक्का गेल्या सहा महिन्यांत डॉलरच्या तुलनेत 27 टक्क्यांनी घसरले आहे.
आता, एका डॉलरची किंमत 107 रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही बँकांच्या वाढत्या एनपीएवर चिंता व्यक्त केली असून सरकारला बँकिंग क्षेत्राचे नियम आणि देखरेख व्यवस्थेत सुधारणा करण्यास सांगितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.