Bangladesh Politics: 'हिंदू धर्मग्रंथ अश्लील'; बांग्लादेशी नेते तारिक रहमान यांचे वादग्रस्त विधान

बांगलादेशमध्ये होणाऱ्या निवडणुकांपूर्वी राजकीय खळबळ उडाली आहे
Bangladesh Politics
Bangladesh PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

Bangladesh Politics: बांगलादेशमध्ये 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांपूर्वी राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. विरोधी पक्षाने धर्माचा वापर करण्यास सुरुवात केली असून शेख हसीना सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न तीव्र झाले आहेत.

एका वृत्तानुसार खालिद झिया यांचा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आता अतिरेकी घटकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. जमात-ए-इस्लामीचा प्रमुख नुरुल हक नूर आणि त्याचा सहकारी तारेक रहमान यांनी हिंदू अल्पसंख्याकांना लक्ष्य केले आहे. या संघटनांना खालिद झिया यांचा पडद्याआडून पाठिंबा मिळत असल्याचे मानले जात आहे.

जमात-ए-इस्लामीच्या सहयोगी संघटनांनी बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंच्या विरोधात मोठे वक्तव्य केले आहे. बांगलादेश गोनो राइट्स कौन्सिलचे नेते आणि नुरुल हक नूर यांचे सहकारी तारेक रहमान यांनी हिंदूंबद्दल द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.

सोशल मीडियावर (Social Media) केलेल्या लाइव्हमध्ये हिंदू धर्माचे धर्मग्रंथ कोणतेही नैतिक शिक्षण देत नाही, असे म्हटले होते. त्यांनी ग्रंथांचे वर्णनही अश्लील म्हटले आहे.

Bangladesh Politics
Pakistan Crisis: पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिघडली, 1 किलो मैद्याच्या किमतीने...
  • रोहिंग्यांबाबत मोठे वक्तव्य

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये (Video) तारेक रहमान रोहिंग्यांवर शस्त्रे टाकून सरकार पाडतानाही ऐकू येत आहेत. त्याचवेळी, बांगलादेशच्या स्थानिक मीडियाने दावा केला आहे की तारेक रहमानचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर काही रोहिंग्या नेत्यांचीही हत्या करण्यात आली आहे.

पत्रकारांनाही दिला इशारा

मीडिया रिपोर्ट्सनुसार 2021 मध्ये दुर्गापूजेदरम्यान अनेक हिंदूं लोकांवर हल्ले झाले होते. या घटनांमागे नूरुलचा हात असल्याचा दावा केला जात आहे. नूरुलने सौदी अरेबियातून फेसबुक लाईव्ह केल्याचा आरोप आहे. यामध्ये त्यांनी पत्रकारांना सुधारण्याचा इशाराही दिला आहे.

एवढेच नाही तर नूर यांनी पत्रकारांना सत्तेचे गुलामही म्हटले होते. व्हायरल व्हिडिओमध्ये पत्रकारांना इशारा देताना नूर म्हणाले की, पत्रकारांनी त्यांच्या 'मिशन'वर प्रश्नचिन्ह लावू नये. व्हायरल व्हिडिओमध्ये सरकार पाडण्याचा दावाही करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com