Bangladesh President: 1971 च्या युद्धात सक्रिय सहभागी असणारे 'हे' होणार बांगलादेशचे नवे राष्ट्रपती

शहाबुद्दीन यांनी 1971 च्या युद्धात स्वातंत्र्य सैनिक म्हणून सक्रिय सहभाग घेतला आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर ते पुन्हा राजकारणात आले.
Bangladesh President
Bangladesh PresidentDainik Gomantak
Published on
Updated on

बांगलादेशच्या सत्ताधारी अवामी लीगने (एएल) मोहम्मद शहाबुद्दीन चुप्पू यांना बांगलादेशचे 22 वे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. शहाबुद्दीन चुप्पू हे बांगलादेशच्या लाचलुचपत प्रतिबंधक आयोगाचे (ACC) माजी आयुक्त, सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि स्वातंत्र्यसैनिक आहेत.

पक्षाने देशाचे पुढील अध्यक्ष म्हणून मोहम्मद शहाबुद्दीन चुप्पू यांची नियुक्ती केली आहे. असे अवामी लीगचे सरचिटणीस ओबेदुल कादर यांनी सांगितले. (Shahabuddin Chuppu set to become next Bangladesh president)

Bangladesh President
Cricket Catch: क्रिकेट इतिहासातील अप्रतिम झेल, तुफान व्हायरल होतोय 'या' भावाचा व्हिडिओ

अवामी लीगला संसदेत पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे बांगलादेशच्या अध्यक्षपदी शहाबुद्दीन चुप्पू यांची निवड जवळपास निश्चित आहे. विद्यमान राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हमीद यांचा कार्यकाळ या वर्षी 24 एप्रिल रोजी संपत आहे. अवामी लीग संसदीय पक्षाने (एएलपीपी) पंतप्रधान शेख हसीना यांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार नेमायचा की नाही हे ठरवण्यास सांगितले होते. असे अवामी लीगचे सरचिटणीस ओबेदुल कादिर यांनी सांगितले.

बराच विचारमंथन केल्यानंतर हसीना यांनी माजी न्यायाधीश मोहम्मद शहाबुद्दीन चुप्पू यांचे नाव सुचवले. बांगलादेशच्या 350 सदस्यांच्या संसदेत अवामी लीगचे सध्या 305 सदस्य आहेत. त्यामुळे चुप्पू यांची अध्यक्षपदी निवड होणे जवळपास निश्चित झाले आहे.

Bangladesh President
Delhi Mumbai Expressway: दिल्ली मुंबई अंतर 12 तासांनी कमी होणार, द्रुतगती मार्गाची 10 वैशिष्ट्ये

कोण आहेत शहाबुद्दीन चुप्पू?

शहाबुद्दीन चुप्पूचा जन्म पबना जिल्ह्यात झाला. ते 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1970 च्या सुरुवातीच्या काळात अवामी लीगच्या विद्यार्थी आणि युवा शाखेचे नेते होते. 1971 च्या मुक्तिसंग्रामातही त्यांनी भाग घेतला होता. छुप्पू यांच्या पश्चात पत्नी रेबेका सुलताना आणि एक मुलगा आहे. सुलताना या बांगलादेशमध्ये सहसचिव होत्या.

1971 च्या युद्धात सक्रिय सहभाग

अवामी लीगचे माजी अध्यक्षीय सदस्य मोहम्मद नसीम यांच्यासोबत त्यांनी युद्धादरम्यान पबना जिल्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शहाबुद्दीन यांनी 1971 च्या युद्धात स्वातंत्र्य सैनिक म्हणून सक्रिय सहभाग घेतला आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर ते पुन्हा राजकारणात आले. 1975 मध्ये बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येनंतर, शाबुद्दीनला अटक करण्यात आली आणि तीन वर्षांसाठी तुरुंगात टाकण्यात आले कारण तो बंगबंधूंनंतर सत्तेवर आलेल्या नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या विरोधात होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com