Italian Prime Minister Giorgia Meloni: इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या पार्टनरने देशातील वाढत्या बलात्काराच्या घटना कमी करण्यासाठी महिलांना अजब सल्ला दिला आहे. जास्त दारु न पिऊन महिला बलात्कार टाळू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे.
देशातील हायप्रोफाईल गँगरेप प्रकरणाच्या चर्चेदरम्यान एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, जर तुम्ही नाचत असाल तर तुम्ही मद्यधुंद असू शकता, परंतु जर तुम्ही दारु पिणे टाळू शकता, तर कदाचित तुम्ही अडचणीत येण्यापासून वाचू शकता.
त्यांच्या या वक्तव्यामुळे देशात खळबळ उडाली आहे. त्यांना विरोधी पक्षांकडून आणि सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
महिलांसोबत (Women) होणाऱ्या बलात्काराच्या वाढत्या घटनांवर इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा पार्टनर आंद्रिया जिआमब्रुनो यांनी वादग्रस्त विधान केले. खरे तर, नुकतेच नेपल्स आणि पालेर्मोजवळ घडलेले हाय-प्रोफाइल सामूहिक बलात्कार प्रकरण गाजत आहे.
Rete 4 या उजव्या विचारसरणीच्या वाहिनीवरील एका कार्यक्रमासाठी बोलताना आंद्रिया जिआम्ब्रुनो म्हणाले की, "जर तुम्ही नाचत असाल तर तुम्हाला मद्यपान करण्याचा पूर्ण अधिकार आहे... पण जर तुम्ही असे करणे टाळले तर तुम्ही कदाचित अडचणीत सापडणार नाही."
शो दरम्यान, जिआमब्रुनो यांनी उजव्या विचारसरणीच्या लिबेरो वृत्तपत्राचे संपादक पिट्रो सेनाल्डी यांच्याशी देखील सहमती दर्शविली.
ते पुढे म्हणाले की, "जर तुम्हाला बलात्कारापासून वाचायचे असेल, तर सर्वप्रथम भान गमावू नका..." जियाम्ब्रुनो आणि सेनाल्डी या दोघांनाही बलात्कार करणाऱ्यांचा निषेध केला.
मात्र, त्यांच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर (Social Media) खळबळ उडाली आहे. पीडितेला दोषी ठरवून तिला आरोपी म्हटल्याने त्यांना ट्रोल केले जात आहे.
दुसरीकडे, विरोधी पक्षांनी देशाच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना त्यांच्या पाटर्नरने केलेल्या वक्तव्याचे समर्थन न करण्याचे आवाहन केले आहे.
वक्तव्यावर टीका करताना, विरोधी फाइव्ह स्टार मूव्हमेंट पार्टी (M5S) ने एका निवेदनात म्हटले आहे की "त्यांचे शब्द अस्वीकार्य आणि लज्जास्पद आहेत" आणि "ते पुरुष प्रधान संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात", द गार्डियनने वृत्त दिले आहे.
दुसरीक़डे, आपल्या वक्तव्याचा बचाव करताना आंद्रिया जियाम्ब्रुनो म्हणाले की, "जर मी काही चुकीचं बोललो असेल तर मी माफी मागतो." "मी म्हणालो की बलात्कार हे एक घृणास्पद कृत्य आहे. मी तरुणांना सांगितले की, ड्रग्ज घेऊ नका.
मी त्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला कारण दुर्दैवाने वाईट लोक नेहमीच आपल्या आजूबाजूला असतात. नशेत असलेल्या महिलांवर बलात्कार करण्याचा पुरुषांना अधिकार आहे असे मी म्हटले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.