Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

Austria Diamond Robbery: ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथील प्रसिद्ध 'म्युझियम ऑफ ॲप्लाइड आर्ट्स' मधून 1930च्या दशकातील अत्यंत मौल्यवान आणि दुर्मिळ हिऱ्यांचा हार चोरीला गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.
200 Carat Diamond Necklace stolen from Vienna museum
200 Carat Diamond Necklace stolen from Vienna museum AustriaDainik Gomantak
Published on
Updated on

Austria Diamond Robbery: ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथील प्रसिद्ध 'म्युझियम ऑफ ॲप्लाइड आर्ट्स' मधून 1930च्या दशकातील अत्यंत मौल्यवान आणि दुर्मिळ हिऱ्यांचा हार चोरीला गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. सुमारे 200 कॅरेटपेक्षा जास्त वजन असलेल्या आणि 673 हिऱ्यांनी मढवलेल्या या प्लॅटिनम हाराची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत तब्बल 4 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 37.94 कोटी रुपये आहे. 27 ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास आंतरराष्ट्रीय पातळीवरील दोन अट्टल चोरांनी सामान्य पर्यटकांसारखी रीतसर तिकिटे काढून संग्रहालयात प्रवेश करुन हा हार लंपास केला.

संग्रहालयात सुरु असलेल्या दागिन्यांच्या प्रदर्शनादरम्यान, चोरट्यांनी संधी साधून 676 हिऱ्यांच्या हाराच्या डिस्प्ले केसकडे मोर्चा वळवला. एका चोराने शस्त्राचा धाक दाखवला, तर दुसऱ्याने हातोड्याच्या साहाय्याने सुरक्षा काच फोडली. काच फुटताच अलार्म वाजला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली, परंतु अवघ्या काही सेकंदात चोर हार घेऊन जवळील 'स्टाडपार्क'च्या दिशेने पसार झाले. विशेष म्हणजे, चोरट्यांनी केवळ या विशिष्ट हारालाच हात लावला. इतर कोणत्याही मौल्यवान दागिन्याला त्यांनी स्पर्शही केला नाही. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी सुरक्षा यंत्रणांची मोठी फजिती झाली.

200 Carat Diamond Necklace stolen from Vienna museum
Donald Trump Warning: 'इराणला मदत कराल तर याद राखा...' डोनाल्ड ट्रम्पनं पुन्हा जगाला धमकावलं; पुकारलं इकॉनॉमिक वॉर

या चोरीला गेलेल्या हाराला 95 वर्षांचा मोठा शाही इतिहास आहे. हा हार 1938-39 मध्ये इजिप्तची राणी नाझली यांच्यासाठी तयार करण्यात आला होता. त्यांनी 1939 मध्ये आपली मुलगी राजकुमारी फौझिया यांच्या विवाहसोहळ्यात हा हार परिधान केला होता. 2015 मध्ये न्यूयॉर्कमधील सोथेबीच्या लिलावात हा हार 4.3 दशलक्ष डॉलरला विकला गेला होता. व्हिएन्ना पोलीस (Police) आणि इंटरपोलने आता या चोरीच्या तपासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

200 Carat Diamond Necklace stolen from Vienna museum
Donald Trump: 'मोजतबा खामेनेई 90 टक्के संपले!', डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; महिनाभराची युद्धबंदी एका रात्रीत हवेत विरली

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुखवटा घातलेल्या संशयितांचे फोटो जारी करण्यात आले असून चोरी झालेल्या हाराची नोंद इंटरपोलच्या चोरी झालेल्या कलाकृतींच्या जागतिक डेटाबेसमध्ये करण्यात आली. या घटनेनंतर हे प्रदर्शन आणि संग्रहालय सामान्य लोकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com