Video: दक्षिण कोरियात विरोधी पक्षनेत्यावर प्राणघातक हल्ला… हल्लेखोराने मानेवर केले अनेक वार!

South Korea Opposition Leader Lee Jaemyung: दक्षिण कोरियातील प्रमुख विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख नेते ली जे-म्युंग यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.
South Korea Opposition Leader Lee Jaemyung
South Korea Opposition Leader Lee JaemyungDainik Gomantak
Published on
Updated on

South Korea Opposition Leader Lee Jaemyung: दक्षिण कोरियातील प्रमुख विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख नेते ली जे-म्युंग यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ली जे-म्युंग पत्रकारांशी बोलत असताना बुसानच्या भेटीदरम्यान हा हल्ला करण्यात आला. त्याचवेळी, हल्लेखोराने त्यांच्या मानेवर चाकूने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी होऊन खाली जमिनीवर पडले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये ली जे-म्युंगवर अज्ञात व्यक्तीने कसा हल्ला केला हे स्पष्टपणे दिसत आहे. हल्लेखोर ली जे-म्युंग यांच्या समोर उभा होता. ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना त्याने त्यांच्या गळ्यावर वार केले.

मिळालेल्या माहितीनुसार, ली जे-म्युंग बुसानमधील प्रस्तावित एअरपोर्टला भेट देण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर ली जे-म्युंग जमिनीवर कोसळले. त्यांच्या मानेतून रक्त येऊ लागले. ते थांबवण्यासाठी रुमाल बांधण्यात आला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ली जे-म्युंग सध्या शुद्धीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

South Korea Opposition Leader Lee Jaemyung
South Korea : रातोरात कमी झाले 5 कोटी लोकांचे वय; कोणी एक वर्षाने तर कोणी दोन वर्षांनी झाले लहान

दुसरीकडे, पोलिस हल्लेखोराची चौकशी करत आहेत. सध्या हल्लेखोराची ओळख उघड झालेली नाही. ली जे-म्युंग हे बुसानमधील दक्षिण कोरियाच्या सर्वात मोठ्या डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख आहेत. ते लोकांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यांनी 2022 मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली, ज्यामध्ये त्यांचा युन सुक येओल यांच्याकडून फार कमी मतांनी पराभव झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com