South Korea : रातोरात कमी झाले 5 कोटी लोकांचे वय; कोणी एक वर्षाने तर कोणी दोन वर्षांनी झाले लहान

South Korea News: सरकारच्या एका निर्णयामुळे दक्षिण कोरियातील 5.1 कोटी लोकांचे वय एक ते दोन वर्षांनी कमी झाले आहे.
South Korea Age System
South Korea Age SystemDainik Gomantak
Published on
Updated on

South Korea Age System: होय, तुम्ही हे बरोबर वाचत आहात. दक्षिण कोरियातील 5.1 कोटी लोकांचे वय एक ते दोन वर्षांनी कमी झाले आहे.

वास्तविक, दक्षिण कोरियातील लोकांचे वय एकाएकी एका रात्रीत कमी होण्यामागचे कारण म्हणजे वयाच्या गणनेबाबत जारी करण्यात आलेला नवा नियम.

दक्षिण कोरियाने वय मोजण्याची आपली पारंपरिक पद्धत बदलली आहे. त्यांनी जगभर वापरल्या जाणार्‍या आंतरराष्ट्रीय पद्धतीचा स्वीकार केला आहे.

बुधवारी सादर करण्यात आलेल्या सुधारणांनुसार, करार आणि इतर अधिकृत दस्तऐवजांसह बहुतेक प्रशासकीय आणि नागरी बाबींमध्ये वयाची गणना जागतिक पद्धतीने केली जाईल.

दक्षिण कोरियाने वय मोजण्याच्या आंतरराष्ट्रीय  पद्धतीचा स्वीकार केल्यानंतर एक महिला आपले नवे वय दाखवत आहे.
दक्षिण कोरियाने वय मोजण्याच्या आंतरराष्ट्रीय पद्धतीचा स्वीकार केल्यानंतर एक महिला आपले नवे वय दाखवत आहे.Dainik Gomantak

पारंपरिक पद्धतीचा त्याग

दक्षिण कोरिया 1960 पासून वैद्यकीय आणि कायदेशीर हेतूंसाठी जन्माच्या वेळी शून्यापासून वय मोजण्याचा आणि प्रत्येक वाढदिवसाला एक वर्ष जोडण्याचा आंतरराष्ट्रीय नियम वापरत आहे.

असे असूनही, बरेच लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात पारंपारिक पद्धतीचा वापर करत राहिले. डिसेंबरमध्ये, देशाने पारंपारिक पद्धत सोडून पूर्णपणे आंतरराष्ट्रीय मानक स्वीकारण्याचा कायदा केला.

जुना कायदा

खरं तर, पूर्वीच्या प्रणालीनुसार, दक्षिण कोरियामध्ये जन्माला आल्यावर मूल एक वर्षाचे मानले जाते. एवढेच नाही तर प्रत्येक जानेवारी हे वर्ष म्हणून जोडले जाते. अशा प्रकारे, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जन्मलेले मूल मध्यरात्री दोन वर्षांचे होईल.

डिसेंबरमध्ये दक्षिण कोरियाच्या संसदेने नियमांमधील दुरुस्तीला मंजुरी दिली होती. संसदेने सांगितले की, वयाची गणना करण्यासाठी स्वीकारलेल्या आंतरराष्ट्रीय पद्धतीमुळे लोकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर होईल.

South Korea Age System
PM Modi यांना नडणारी पत्रकार होतेय ट्रोल; बायडन सरकार म्हणाले, "आम्ही हे सहन करणार नाही"

या समस्या दूर होतील

सरकारचे कायदे मंत्री ली वान-क्यु यांनी सांगितले की अध्यक्ष यून सुक-येओल यांनी वयाच्या मानकांमध्ये सुधारणा केली जाईल असे वचन दिले होते. आता वया मोजायची पद्धत बदलली आहे.

ते म्हणाले की, आता वयाची मोजणी करण्याच्या पद्धतीमुळे निर्माण होणारे कायदेशीर वाद, तक्रारी आणि सामाजिक गोंधळ बऱ्याच अंशी कमी होतील, अशी आशा आहे.

गेल्या वर्षी एका सरकारी सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 86 टक्के दक्षिण कोरियाने नवीन कायद्याचे समर्थन केले आहे.

South Korea Age System
Pakistan Economic Crisis: आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला; पाकिस्तानी सेल्समन म्हणातो, आम्ही भारतासोबत कोणतेही युद्ध जिंकले नाही

दक्षिण कोरियामधील बहुतेक लोक कोरियन प्रणाली वापरून गणना केलेले वयोगट निव़डतात. दक्षिण कोरियामधील दैनंदिन जीवनात आणि सामाजिक कार्यांमध्ये याचा वापर केला जातो.

आंतरराष्ट्रीय प्रणाली वापरून मोजले जाणारे वय अनेकदा कायदेशीर आणि अधिकृत बाबींसाठी वापरले जाते.

याव्यतिरिक्त, काही कायदे जसे की मद्यपान, धुम्रपान आणि लष्करी नोंदणीसाठी कायदेशीर वय म्हणून कॅलेंडर वर्षानुसार गणना केलेले वय विचारात घेतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com