Philippines Earthquake: फिलीपाईन्समध्ये हाहाकार! 7.8 तीव्रतेच्या भीषण भूकंपात 19 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी

Philippines Earthquake 19 Death: फिलीपाईन्सच्या दक्षिण किनारपट्टीला सोमवारी (8 जून) एका अत्यंत शक्तिशाली आणि विनाशकारी भूकंपाने हादरवून सोडले.
Philippines Earthquake 19 Death
Philippines EarthquakeDainik Gomantak
Published on
Updated on

Philippines Earthquake 19 Death: फिलीपाईन्सच्या दक्षिण किनारपट्टीला सोमवारी (8 जून) एका अत्यंत शक्तिशाली आणि विनाशकारी भूकंपाने हादरवून सोडले. रिश्टर स्केलवर नोंदलेल्या 7.8 तीव्रतेच्या या महाभयंकर भूकंपामुळे आतापर्यंत 19 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. या शक्तिशाली भूकंपानंतर समुद्रात एक मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळल्या, ज्यांनी आसपासच्या किनारपट्टी भागाचे मोठे नुकसान केले.

या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका 'जनरल सँटोस' या गजबजलेल्या शहराला बसला असून, तिथे अनेक इमारती पत्त्यांसारख्या कोसळल्या. तसेच, पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले. सुमारे 7 लाख लोकसंख्या असलेले हे शहर ट्यूना माशांच्या निर्यातीचे मुख्य केंद्र मानले जाते. त्सुनामीच्या लाटांमुळे एका किनारपट्टीवरील गावाचे अतोनात नुकसान झाले असून, इंडोनेशिया, पलाऊ आणि दक्षिण जपानपर्यंत त्सुनामीच्या लहान लाटांची नोंद झाली.

Philippines Earthquake 19 Death
China Philippines Tensions: चीनची ‘दादागिरी’; फिलिपाइन्सच्या नौदलावर केला गलवानसारखा हल्ला

फिलीपाईन्सच्या इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनॉलॉजी अँड सिस्मॉलॉजीचे संचालक टेरेसिटो बाकोलकोल यांनी सांगितले की, हा या वर्षातील सर्वात मोठा भूकंप असून यात मोठ्या प्रमाणावर हानी झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू मिंदानाओ बेटाजवळील समुद्रात, सरंगानी प्रांतातील मासिम शहरापासून सुमारे 32 किमी नैऋत्येला, जमिनीखाली 33 किमी खोलीवर होता.

नागरी संरक्षण कार्यालयाचे प्रादेशिक संचालक रॉड सोस्मेना यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एकट्या जनरल सँटोस शहरात 7 लोकांचा मृत्यू झाला असून 130 हून अधिक जण जखमी झाले. येथील अनेक लहान इमारती कोसळल्या असून, शहराला जोडणाऱ्या एका मुख्य पुलाला तडे गेले. याशिवाय दक्षिण कोटाबाटो, दाव्हाओ ऑक्सिडेंटल आणि बालुत बेटावर मशीद कोसळल्याने आणि भूस्खलनामुळे इतर 9 जणांना आपला जीव गमवावा लागला. जनरल सँटोस येथील एका कोसळलेल्या दोन मजली शाळेत काही विद्यार्थी अडकल्याची भीती व्यक्त होत असून, 7 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती राष्ट्रीय पोलिसांनी दिली.

Philippines Earthquake 19 Death
Philippines Terror Attack: दक्षिण फिलिपाइन्समधील विद्यापीठात मोठा बॉम्बस्फोट; परदेशी दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय, 4 ठार

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर देशभरातील सरकारी शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या, मात्र या भूकंपामुळे दक्षिण भागात भीतीपोटी पळापळ करताना सुमारे 100 हून अधिक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले तर काही जण घाबरुन बेशुद्ध पडले. खबरदारीचा उपाय म्हणून जनरल सँटोस येथील विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले असून, 17 देशांतर्गत विमान उड्डाणे रद्द करण्यात आली.

प्रत्यक्षदर्शींनी हा प्रसंग अत्यंत थरारक आणि भयानक असल्याचे सांगितले. भूकंप (Earthquake) इतका तीव्र होता की, दाव्हाओ येथील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एडनार दयांगहिरांग यांना त्यांच्या घराबाहेर उभे राहताना स्वतःचा समतोल राखणेही कठीण झाले. तसेच मनिला येथील डीझेडआरएच रेडिओ स्टेशनच्या प्रांतीय इमारतीचा काही भाग कोसळला, परंतु सुदैवाने कर्मचारी सुखरुप बचावले.

Philippines Earthquake 19 Death
Philippines Ferry Fire: फिलिपाइन्समध्ये मोठी दुर्घटना, बोटीला आग लागून 31 जणांचा होरपळून मृत्यू

त्सुनामीच्या तीव्रतेबाबत सांगायचे तर, सुलतान कुदरात आणि सरंगानी प्रांतात 1 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटांची नोंद झाली, तर कियाम्बा शहरात 1.4 मीटर उंचीची सर्वोच्च लाट पाहिली गेली. या भूकंपाचे धक्के शेजारील मलेशियाच्या सबा राज्यापर्यंत जाणवले. इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर 83 सेमी, पलाऊमध्ये 30 सेमी आणि जपानच्या दुर्गम बेटांवर 20 सेमी पर्यंतच्या लाटांची नोंद झाली. फिलीपाईन्स देश प्रशांत महासागराच्या 'रिंग ऑफ फायर'वर स्थित असल्याने येथे सतत भूकंप, ज्वालामुखी आणि चक्रीवादळांचे संकट घोंगावत असते. देशाचे अध्यक्ष फर्डीनंड मार्कोस ज्युनियर यांनी या संकटसमयी मिंदानाओ भागाला पूर्ण केंद्रीय मदत देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, प्रशांत त्सुनामी चेतावणी केंद्राने भूकंपाच्या सुमारे पाच तासांनंतर त्सुनामीचा धोका आता पूर्णपणे टळल्याचे जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com