Philippines Terror Attack: दक्षिण फिलिपाइन्समधील विद्यापीठात मोठा बॉम्बस्फोट; परदेशी दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय, 4 ठार

Philippines Terror Attack: दक्षिण फिलिपाइन्समधील युनिव्हर्सिटीच्या जीममध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे, ज्यामध्ये चार जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत.
Philippines Terror Attack
Philippines Terror AttackDainik Gomantak

Philippines Terror Attack: दक्षिण फिलिपाइन्समधील युनिव्हर्सिटीच्या जीममध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे, ज्यामध्ये चार जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी कॅथोलिक सामूहिक सेवेदरम्यान मारावी शहरातील मिंडानाओ स्टेट युनिव्हर्सिटीमधील जीममध्ये स्फोट झाला. फिलिपाइन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि सांगितले की त्यांनी सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलिस आणि सशस्त्र दलांना निर्देश दिले आहेत. मार्कोस पुढे म्हणाले की, "मी दहशतवाद्यांनी केलेल्या अत्यंत घृणास्पद कृत्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो."

मार्कोस पुढे म्हणाले की, "जे अतिरेकी निर्दोष लोकांविरुद्ध हिंसा करतात ते नेहमीच आपल्या समाजाचे शत्रू मानले जातील."

फिलिपाइन्स युनिव्हर्सिटीमध्ये दहशतवादी हल्ला

मिंडानाओमधील लानाओ डेल सुर प्रांताचे गव्हर्नर ममिंटल अलोन्टो एडिओंग जूनियर यांनी "हिंसक बॉम्बस्फोट" ची निंदा केली. "येथे माझ्या प्रांतात, आम्ही मूलभूत मानवी हक्कांचे समर्थन करतो आणि त्यात धर्माचा अधिकार समाविष्ट आहे," असे एडिओंग यांनी एका निवेदनात म्हटले. ते पुढे म्हणाले की, "शैक्षणिक संस्थांवरील दहशतवादी हल्ल्यांचाही निषेध केला पाहिजे, कारण ही अशी ठिकाणे आहेत जी शांततेची संस्कृती वाढवतात आणि आपल्या तरुणांना या देशाचे भविष्य घडविण्यासाठी तयार करतात."

Philippines Terror Attack
Philippines Boat Accident: फिलिपाइन्समध्ये बोट उलटल्याने 30 जणांचा मृत्यू

मिंडानाओ स्टेट युनिव्हर्सिटीने सांगितले की ते "खूप दुःखी आणि भयभीत" आहेत. पुढील सूचना येईपर्यंत क्लास बंद ठेवले आहेत. आम्ही या भयंकर हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. आम्ही या हल्ल्यांमुळे प्रभावित झालेल्यांना मदत पोहोचवत आहोत." दरम्यान, जीमजवळील वसतिगृहात राहणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, 'त्याने पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटासारखा मोठा आवाज ऐकला.'

प्रत्यक्षदर्शीने पुढे सांगितले की, त्याने घटनास्थळी अनेक पोलिस अधिकारी आणि रुग्णवाहिका तैनात केलेल्या पाहिल्या. पोलिसांनी सांगितले की, ते स्फोट ISIL समर्थक (ISIS) दहशतवाद्यांनी घडवून आणल्याच्या शक्यतेसह तपास करत आहेत. सशस्त्र फुटीरतावादी गटांच्या बंडाच्या दरम्यान मिंडानाओने अनेक दशकांपासून हिंसाचाराचा सामना केला आहे.

Philippines Terror Attack
Earthquake In Philippines: फिलिपाइन्समध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 6.5 तीव्रता

दुसरीकडे, शनिवारी फिलीपीन सैन्याने घोषित केले की, त्यांनी मारावीपासून सुमारे 200 किमी (125 मैल) ऑपरेशनमध्ये 11 दहशतवादी मारले आहेत. 2017 मध्ये, मारावी हे ISIL द्वारे प्रेरित पाच महिन्यांच्या वेढ्याचे ठिकाण होते, ज्यामुळे 1,000 हून अधिक लोक मरण पावले. अनेक दशकांच्या संघर्षानंतर, मनिलाने 2014 मध्ये मोरो इस्लामिक लिबरेशन फ्रंट या सर्वात मोठ्या फुटीरतावादी गटाशी शांतता करारावर स्वाक्षरी केली, परंतु लहान फुटीरतावादी गटांनी अशांत प्रदेशात हल्ले करणे सुरुच ठेवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com