Imran Khan: इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? भेटायला गेलेल्या बहिणींना पोलिसांकडून धक्काबुक्की; पाकिस्तानात तणाव

Imran Khan Death Rumor: रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या करण्यात आली.
Imran Khan Death Rumor
Imran KhanDainik Gomantak
Published on
Updated on

Imran Khan Death Rumor: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान सप्टेंबर 2023 पासून रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात बंद आहेत. मात्र, सध्या संपूर्ण पाकिस्तानात त्यांच्या हत्येची अफवा वेगाने पसरली, ज्यामुळे देशात एकच खळबळ उडाली. पाकिस्तानची सेना आणि सरकारकडून त्यांना तुरुंगात त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना कोणालाही भेटू दिले जात नसल्याच्या अफवांना अधिक बळ मिळत आहे.

बहिणींना धक्काबुक्की आणि मारहाण

मंगळवारी रात्री (25 नोव्हेंबर) इम्रान खान (Imran Khan) यांच्या बहिणी नोरीन खान, अलीमा खान आणि उजमा खान यांना तुरुंगाबाहेरुन अक्षरशः धक्काबुक्की करुन ओढून बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर पोलिसांनी किरकोळ बळाचा वापर केल्याचेही सांगण्यात येत आहे. पीटीआय कार्यकर्ते आणि बहिणींनी मागणी केली की, त्यांना कोणत्याही परिस्थितीत इम्रान खान यांना भेटायचे आहे, पण पाकिस्तान सरकारने त्यांची ही मागणी फेटाळून लावली.

Imran Khan Death Rumor
Imran Khan : क्रिडाविश्वात खळबळ, वर्ल्डकप विजेत्या संघाच्या कर्णधाराला 14 वर्षांचा तुरुंगवास; पत्नीलाही 7 वर्षांची शिक्षा

अफगाणिस्तान माध्यमांचा दावा

अफगाणिस्तानच्या काही माध्यमांनी बुधवारी (26 नोव्हेंबर) दावा केला की, रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या करण्यात आली. या दाव्यानंतर पाकिस्तानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. खान यांचे समर्थक सातत्याने मागणी करत आहेत की, जर इम्रान खान सुरक्षित आणि जिवंत असतील, तर त्यांना कोणालाही भेटू का दिले जात नाही? सोशल मीडियावरही लोक सध्याच्या शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

पीटीआय नेते फवाद चौधरी यांनी भारतीय माध्यमांशी बोलताना इम्रान खान यांच्या मृत्यूच्या बातम्या 'अफवा' आणि 'खोट्या' असल्याचे सांगितले. मात्र, या कठीण काळात अनेक नेत्यांनी त्यांना सोडून दिल्यामुळे समर्थक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.

Imran Khan Death Rumor
Imran Khan: इम्रान खान यांना झटका; कोर्टाच्या 'या' निर्णामुळे तुरुंगातील वाढला आणखी मुक्काम

तुरुंगाबाहेर हजारो समर्थकांचा जमाव

इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवेमुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे. हजारो पीटीआय समर्थक अदियाला तुरुंगाबाहेर मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. ते अधिकाऱ्यांकडे आपल्या नेत्याच्या तब्येतीबद्दल तात्काळ माहिती देण्याची मागणी करत आहेत. कोणतीही हिंसक घटना घडू नये आणि समर्थकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी तुरुंगाबाहेर शेकडो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. इम्रान खान यांच्या बहिणी अलीमा खान, डॉ. उजमा आणि नोरीन नियाजी यांनी जेलजवळच्या एका नाक्यावर धरणे आंदोलन केले. त्यांना पुढे जाण्याची परवानगी मिळाली नाही.

Imran Khan Death Rumor
Imran Khan Gets 7 Year Sentence: इम्रान खानला आठवडाभरात तिसरा झटका, कोर्टाने पत्नी बुशरा बीबीसह सुनावली 7 वर्षांची शिक्षा

पंजाबचे पोलीस प्रमुख उसमान अन्वर यांना लिहिलेल्या तक्रारीत नोरीन नियाजी यांनी म्हटले की, त्या 71 वर्षांच्या असूनही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे केस धरुन त्यांना रस्त्यावर ओढले. पोलिसांच्या कारवाईदरम्यान लाईट्स अचानक बंद करण्यात आल्या, जेणेकरुन अंधारात हिंसाचार करता येईल, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. इम्रान खान यांच्या कुटुंबीयांना गेल्या जवळपास एका वर्षापासून त्यांना भेटू दिले गेलेले नाही. त्यांच्या बहिणींची शेवटची भेट 30 ऑक्टोबर 2024 रोजी झाली होती. तसेच, ऑक्टोबर 2024 नंतर कोणत्याही समर्थक किंवा राजकीय पक्षाच्या सदस्याला भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे त्यांची तब्येत आणि जिवंत असण्याबद्दलचे प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com