Mukesh Ambani-Anand Mahindra: मुकेश अंबानी-आनंद महिंद्रा यांना अमेरिकेत बुक करावी लागली 'Uber', कारण जाणून तुम्हीही म्हणाल...

Anand Mahindra: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते दररोज सोशल मीडियावर काही फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असतात.
Mukesh Ambani-Anand Mahindra
Mukesh Ambani-Anand MahindraTwitter/ @anandmahindra

Mukesh Ambani Anand Mahindra Uber: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते दररोज सोशल मीडियावर काही फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असतात. यातच, महिंद्रा यांनी नुकताच एक फोटो पोस्ट करुन एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा आणि दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानीही या फोटोत दिसत आहेत. पण अमाप संपत्ती असूनही अमेरिकेत मुकेश अंबानी आणि आनंद महिंद्रा यांच्यावर कॅब बुक करण्याची वेळ आली.

वास्तविक असे घडले की, आनंद महिंद्रा आणि मुकेश अंबानी यांची शटल कार चुकली होती. याच कारणामुळे त्यांना अमेरिकेतून परतताना उबेर बुक करावी लागली. पण भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आणि अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी त्याला लिफ्ट दिली आणि इच्छित स्थळी पोहोचवले.

Mukesh Ambani-Anand Mahindra
PM Modi US Visit: 'अमेरिका-भारत जगाचे नेतृत्व करताहेत...', बायडन यांचा चीनला सूचक इशारा

महिंद्रा यांनी ट्विटमध्ये काय म्हटले

आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये संपूर्ण किस्सा शेअर केला आहे. यात त्यांनी लिहिले की, 'मला वाटते याला 'वॉशिंग्टन मोमेंट' म्हणतात. मुकेश अंबानी, वृंदा कपूर आणि मी टेक हँडशेक मीटिंगनंतर वाणिज्य सचिवांशी गप्पा मारत होते. यादरम्यान शटल बस चुकली. आम्ही उबेर बुक करण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा आम्ही नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पाहिले. यानंतर सुनीता यांनी आम्हाला इच्छित स्थळी पोहोचवले.'

दुसरीकडे, महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा आणि रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी अमेरिकेच्या स्टेट डिनरमध्ये सहभागी होण्यासाठी वॉशिंग्टनला गेले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ डिनरचे आयोजन केले होते. या डीनरला भारतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, सत्या नडेला, इंदिरा नूयी आणि मुकेश अंबानी आणि नीता अंबानी सहभागी झाले होते.

Mukesh Ambani-Anand Mahindra
PM Modi US Visit: मोदी-बायडन मैत्रीचा नवा अध्याय, भारताला 'या' 8 करारामधून लॉटरी

अमेरिका दौऱ्यावर काय म्हणाले उद्योग जगत

उद्योग जगताला आशा आहे की, पंतप्रधान मोदींच्या यूएस दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांना चालना मिळेल आणि संरक्षण, सेमीकंडक्टर, अंतराळ आणि एआय सारख्या क्षेत्रात धोरणात्मक सहकार्य वाढेल. उद्योग संघटना कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) च्या मते, भागीदारीमध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली, ज्यामध्ये संरक्षण, सेमीकंडक्टर आणि अवकाश यासह धोरणात्मक तंत्रज्ञान सहकार्य आणि AI, क्वांटम सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात मजबूत सहकार्य अपेक्षित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com