भारताला टार्गेट करुन अमेरिकेची मोठी कारवाई! 'ऑपरेशन मेल्टडाउन' अंतर्गत 200 हून अधिक फार्मसी वेबसाइट्स बंद; काय नेमकं प्रकरण?

US DEA Action: अमेरिकन 'ड्रग्ज एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशन'ने (DEA) बुधवारी दिलेल्या निवेदनानुसार, देशभरात राबवलेल्या विशेष मोहिमेत चार जणांना अटक करण्यात आली.
US DEA Action
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

US DEA Action: अमेरिकेतील फेडरल अधिकाऱ्यांनी भारत-आधारित एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटनेशी (TCO) संबंधित 200 हून अधिक वेबसाइट डोमेन जप्त करुन मोठी कारवाई केली. या वेबसाइट्सच्या माध्यमातून बेकायदेशीर ऑनलाइन फार्मसी चालवल्या जात होत्या, ज्या किमान सहा मृत्यूंना आणि चार गंभीर ओव्हरडोज प्रकरणांना जबाबदार असल्याचे समोर आले.

अमेरिकन 'ड्रग्ज एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशन'ने (DEA) बुधवारी दिलेल्या निवेदनानुसार, देशभरात राबवलेल्या विशेष मोहिमेत चार जणांना अटक करण्यात आली. 'ऑपरेशन मेल्टडाउन' अंतर्गत न्यूयॉर्कच्या यूएस अटॉर्नी ऑफिसच्या सहकार्याने ही कारवाई पार पडली. ही गुन्हेगारी संघटना अमेरिकेत सक्रिय असून बेकायदेशीर रित्या धोकादायक औषधांची विक्री करत होती.

US DEA Action
America Winter Storm: अमेरिकेत 'बर्फाचा प्रलय'! 8000 उड्डाणे रद्द, 14 कोटी लोकांवर मृत्यूचे सावट; ट्रम्प यांनी पुकारली आणीबाणी VIDEO

या प्रकरणाचा तपास 2022 पासून सुरु होता. तपासादरम्यान असे दिसून आले की, या ऑनलाइन फार्मसी कोणत्याही वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय बनावट गोळ्या आणि धोकादायक औषधांच्या लाखो ऑर्डर्स पूर्ण करत होत्या. हे ऑपरेटर अमेरिकन आरोग्य व्यवस्थेचा गैरफायदा घेऊन ग्राहकांना बेकायदेशीर औषधे पाठवत होते, जे थेट फेडरल नियमांचे उल्लंघन आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी घातक ठरले.

अधिकाऱ्यांनी 27 जानेवारीपासून देशभरात अनेक ऑपरेशन्स राबवून 5 'इमिजिएट सस्पेंशन ऑर्डर्स'ही जारी केले आहेत. यासोबतच, या फार्मसीमधून औषधे खरेदी करणाऱ्या 20000 हून अधिक ग्राहकांना पत्राद्वारे तपासात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

US DEA Action
Iran America Tension: "ट्रम्प इराणचे गुन्हेगार...!", खामेनेई यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षावर ठेवला विध्वंसाचा ठपका; जागतिक राजकारणात पुन्हा खळबळ

DEA ॲडमिनिस्ट्रेटर टेरेंस कोल यांनी यावर कडक भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, हे प्रकरण परदेशी तस्कर इंटरनेटचा आडोसा घेऊन अमेरिकन समुदायात कशा प्रकारे विष पसरवत आहेत, याचे जिवंत उदाहरण आहे. हे तस्कर वैध व्यापाराचा मुखवटा घालून बनावट आणि अनधिकृत गोळ्या विकतात, ज्या कोणाच्या तरी मृत्यूला कारणीभूत ठरु शकतात. ही कारवाई केवळ एक चेतावणी नसून, जे कोणी या साइट्स चालवतात किंवा त्यांना मदत करतात, त्यांना शोधून कायद्यानुसार कठोर शिक्षा दिली जाईल.

US DEA Action
America Iran Tension: "यावेळी गोळीचा निशाणा चुकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांना इराणची खुली धमकी; सरकारी टीव्हीवर हत्येच्या प्रयत्नाचे फोटो दाखवल्याने खळबळ

विशेष म्हणजे, 2024 मध्येच DEA ने अशा बनावट ऑनलाइन फार्मसीबद्दल इशारा दिला होता, ज्या फेंटेनिलसारख्या घातक अमली पदार्थांपासून बनवलेल्या गोळ्या विकत होत्या. अमेरिकन वेबसाइट्ससारखे डिझाइन वापरुन या साइट्स स्वतःला 'FDA' मंजूर असल्याचे भासवून सामान्य लोकांची फसवणूक करत होत्या. आता अमेरिका (America) या गुन्हेगारी संघटनांच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी भारत सरकारच्या तपास यंत्रणांसोबतही सक्रियपणे सहकार्य करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com